Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य हिंदुस्थानांत पाय ठेवला तो जेते म्हणून ! त्यांनी हा देश जिंकून येथे सुमारे शतकभर राज्यही केले आणि म्हणूनच जित-जेते भावाचा ठसा आमच्या इतिहासावर कायमचा उठला आहे. पण ही शल्यवत् वोचणारी स्मृति सध्यांच्या दोघांच्याही गुलामगिरीने झाकून टाकली आहे. हिंदू व मुसलमान या दोघांनाही साम्राज्यशाहीचे जू सारखेच जड व जाचक झाले आहे. आणि त्यामुळे मुसलमान हे इतके * हिंदुस्थानचेच' बनले आहेत कीं, मुसलमानी रियासत ही हिंदी इतिहासापासून वेगळी मानणे हे अनुचित आहे. | सत्य किंवा काल्पनिक अशा प्राचीन वैभवाच्या स्मृतीने सध्यांच्या गुलामगिरीच्या स्थितीतही समाधान मानण्याची संवय सर्वांना असते; व तीमुळेच मुसलमानांमध्ये राष्ट्रीय दृष्टीचा किंचितसा प्रादुर्भाव झाला आहे. पण अकबराच्या उदार राज्याचा गर्व वाहणारा किंवा शहाजहानच्या जगप्रसिद्ध शिल्पकृतीकडे अभिमानपूर्ण स्वाभिमानाने पाहणारा हिंदु, मुसलमान बांधवांकडे अगदी तिन्हाईत दृष्टीने नेहमी पाहात असतो. सनातनी हिंदु सुसंस्कृत व विद्वान् अशा मुसलमानांनाही अद्यापि म्लेंच्छ, अपवित्र, रानटीच मानतात; व त्यांच्याशी हान हिंदूहूनही वाईट त-हेने ते वागतात. अपुरी व चुकीची माहिती याचे खरे कारण जेत्यांसंबंधी असलेल्या द्वेषांतच आहे असे दिसते. ते संबंध भूतकालीन होऊनही गेले. मात्र तो द्वेषभाव राजकीय विकासालाच नव्हे तर इतिहासाच्या निःपक्षपाती अभ्यासालाह। मारक होत आहे. एकमेकांच्या संस्कृतीबद्दल योग्य ज्ञान, इतक्या निकट राहूनही, दोघांनाही नाही अशी स्थिति हिंदुस्थानशिवाय इतरत्र कोठेही आढळून येत नाहीं. मुसलमान धर्माचा अज्ञानान तिरस्कार करणारे हिंदूइतके दुसरे लोक कुठल्याही देशांत नाहीत आमच्या राजकीय तत्त्वप्रणालीचे मुख्य अंग म्हणजे आमची आध्यान ३४