इस्लामी सँस्कृती क्रांतिकार्य 2 प्रकरण पहिले उपोद्घात मुसलमानी धर्माचा आकस्मिक उद्गम व त्याचा आश्चर्यकारक विकास या इतिहासांतील अत्यंत चित्तवेधक गोष्टी आहेत. हिंदुस्थानच्या सध्याच्या आणीबाणीच्या वेळी या उद्गमाचा व विकासाचा अभ्यास निःपक्षपातीपणाने होणे अत्यंत अवश्य आहे. इतिहास-संशोधनाच्या दृष्टीनेही या अभ्यासाचे महत्त्व विशेषच आहे. ज्ञानलालसेनें केलेले परिश्रम पूर्णपणे फलप्रद झाल्याशिवाय केव्हाही राहात नाहींत; आणि हिंदुस्थानांत-विशेषतः हिंदु बांधवांना-इस्लामच्या ऐतिहासिक कार्याचे ज्ञान व महंमदी धर्माने मानवी संस्कृतीच्या विकासास केलेली मदत याचे सम्यक ज्ञान होणे हे राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचे होऊन बसले आहे. हिंदुस्थानांत मुसलमान उपरे कां ?- हिंदुस्थानांतही महंमदाचे अनुयायी असंख्य आहेत. कोणत्याही एका मुसलमानी राष्ट्रांत असतील त्याहून कितीतरी अधिक मुसलमान हिंदुस्थानांत आहेत हे क्वचितच कोणाच्या ध्यानीं येत असेल. अनेक शतकांच्या सहवासानंतरही हा बहुसंख्य वर्ग उपरा असाच वाटतो हे कोणत्या मनोवृत्तीचे द्योतक म्हणावे बरें ? दुर्दैवाने झालेल्या या भेदभावाला ऐतिहासिक कारणपरंपरा असेल-आहे. मुसलमानांनी ३ ३३
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/32
Appearance