Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य येणारे हुकूम अनिश्चित स्वरूपाचे होते त्यामुळे त्यांना चीनमध्ये आपलें कार्य करून दाखवितां आलें नाहीं. चीनमध्ये असतांना * चीनची क्रांति व प्रतिक्रांति' या नांवाचा सातशे पानांचा जर्मन भाषेत एक सुंदर ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. अजून त्याचे इंग्लिश भाषांतर झालें नाहीं. १९२८ नंतर त्यांचे थर्ड इंटरनॅशनलशीं बरेच मतभेद झाले. तेथून त्यांना निघावे लागले. कांहीं बाबतींत त्यांचेवर अन्याय झाला आहे असे मानण्यास जागा आहे. परंतु, त्यांनी पुढे रशियांत अगर परदेशांत कोठे तरी राहण्यापेक्षा स्वदेशांतच काम करावे असे ठरविले व ते हिंदुस्थानांत १९३० साली आले. नंतर त्यांना अटक झाली व १२ वर्षांची शिक्षा झाली. पुढे ती अपीलांत ६ वर्षांची करण्यांत आली. फैजपूर कांग्रेसचे आधीं कांहीं दिवस त्यांची सुटका झाली व तेव्हांपासून त्यांनीं कांग्रेसचे राजकारण प्रभावी करण्याची चळवळ चालू ठेवली. सध्या त्यांच्या संपादकत्वाखालीं 'इंडिपेडंट इंडिया' या नांवाचे पत्र गेल्या वर्षभर निघत आहे. त्यांतून त्यांनी केलेली बहुतेक राजकीय भविष्य खरी ठरत आली आहेत. या पुढेही त्यांचे राजकारण नुसते कामगार-शेतकरी यांचेसंबंधीचे न राहतां कांग्रेस प्रभावी करून ' लोकशाहीप्रधान राष्ट्रीय क्रांति घडवून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू राहतील. या त्यांच्या धोरणाबद्दल राजकीय दृष्ट्या पुष्कळांचे मतभेदही असतील. त्यांच्या सर्व जीवनाचे सार दोन शब्दांत असे सांगता येईल: अलौकिक त्याग, बालपणापासून या घटकेपर्यंत अत्यंत कष्टमय क्रांतिकारक जीवन आधुनिक जगांतील चालू क्रांतीचा अनुभवात्मक सक्रिय अभ्यास, रोमांचकारी प्रसंग, सरकारच्या हातावर तुरी देऊन व विस्मयावह रीतीने सुटका ! याही पलीकडे जाऊन त्यांच्या विचार रांचे वर्णन करावयाचे तर ते 'बुद्धिवादी क्रांतिकारक तत्त्वज्ञानी । आहेत; व याच दृष्टीने त्यांची योग्यता हिंदुस्थानांतील कोणत्याही ३०