भाई मानवेंद्रनाथ रॉय राष्ट्रांतील प्रचारशिक्षणाचे कार्य होते. ते १९१९ पासून १९२८ पर्यंत नऊ वर्षे थर्ड इंटरनॅशनलमध्ये होते. । | १९१९ ते १९२२ पर्यंत रॉय यांनी सहा ग्रंथ लिहिले. १९२२ मध्ये त्यांनी लिहिलेला India in Transition हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. या ग्रंथाच्या वाचनानेच हिंदुस्थानांतील पुष्कळसे तरुण समाजवादाचे पुरस्कर्ते झाले. हिंदुस्थानच्या इतिहासाचे ईस्ट इंडिया कंपनीचे सुरुवातीपासूनचे विवेचन माक्सस्ट दृष्टीने यांत केले आहे. त्याचप्रमाणे कामकरी वर्गाच्या विकासाचे विवेचन उत्कृष्ट केले असून एकूण हिंदुस्थानच्या लढ्याची माहिती मार्मिक रीतीने त्यांत दिली आहे. अत्यंत शुद्ध व तर्कपूत विचारदृष्टीने हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नांचे सांगोपांग विवेचन करणारा याशिवाय दुसरा ग्रंथ झाला नाही असे म्हटले तर अतिशयोक्ति बिलकूल होणार नाही. हा ग्रंथ प्रसिद्ध होतांच त्याच्या ३०००० प्रती बलनमध्ये खपल्या. हा ग्रंथ निव्वळ चळवळींत काम करणा-यांनाच उपयुक्त आहे असे नसून अर्थशास्त्रज्ञांनाहीं तो प्रमाणभूत झाला आहे. हिंदुस्थानांत १९०८ पासून कामगार वर्गाची चळवळ अत्यंत जोरात सुरू झाली. १९२१ सालापासून या चळवळींत पडलेल्या कार्यकर्त्यांस क्रांतिकारक समाजवादी दृष्टिकोन देऊन हिंदुस्थानांत समाजवादी क्रांतिकारक गट निर्माण करण्याचे कार्य प्रथमतः भाई रॉय यांनी केले. कानपूर कम्युनिस्ट कटाच्या आरोपींत सूत्रधार मुख्य आरोपी रॉय हे होते. १९२८ मध्ये चीनमध्ये उत्पन्न झालेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठीं सोव्हिएट सरकारने बोरोडिन यांस चीनमध्ये पाठविले. त्यांच्या मदतीस रॉय यांनीही जावे असे ठरले व त्याप्रमाणे ते चीनमध्ये आलेही. त्यांनी तेथे विशिष्ट त-हेनें क्रांति होईल असे सांगितले; परंतु, त्यांचा व बोरोडिन याचा मतभेद झाल्यामुळे रॉय यांना परत रशियांत जावे लागले तेथून फिरून एकवार ते चीनमध्ये आले होते; परंतु ते आजारी पडले व शिवाय रशियांतून २९
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/29
Appearance