Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य नांवाने एक पुस्तक प्रसिद्ध व्हावयाचे होते. परंतु, कांहीं बाबतींत रॉय व लजपतराय यांची मते न जमल्यामुळे त्यांनी आपले नांव त्या पुस्तकावर प्रकाशित केले नाही. मात्र हे पुस्तक लिहिण्यास रॉय यांची मदत लाला लजपतराय यांना फार झाली यांत शंका नाहीं. अमेरिकेत त्यांना फार दिवस राहतां आलें नाहीं. त्यांना पकडण्याचे घाटत होते; परंतु, सरकारच्या हातावर तुरी देऊन ते मेक्सिकोंतील दलित जनतेस क्रांतीच्या कार्यास मदत देण्यासाठी तिकडे निघून गेले. तेथे असतांनाच त्यांनी माक्सिझमचा प्रथम अभ्यास केला. तेथील जनतेला चळवळींत यश मिळवून देऊन त्यांनी त्यांचा जड अंतःकरणाने निरोप घेतला. मेक्सिकोमध्ये ते अत्यंत लोकप्रिय झाले होते. पुढे त्यांना स्पेनमध्ये काम करावे लागले. तेथे त्यांची व बोरोडिन यांची ओळख झाली. बोरोडिन यांना रॉय यांच्या धडाडीचे अत्यंत आश्चर्य वाटले. येथे असतांनाच त्यांची व लेनिन याची प्रथम भेट झाली. स्पेनमध्ये जाण्यापूर्वी बलिनमध्येही त्यांनी एक महिना काढला होता. स्पेन व बलन येथील कामगार चळवळींना योग्य दिशा तेवढ्या अल्प काळांतही त्यांनी लावली. रशियांत क्रांतीनंतर रॉय गेले. तेथे त्यांनी लेनिनवर आपल्या कर्तृत्वाची व स्वतंत्र विचाराची छाप ताबडतोब पाडली. लेनिन याने रॉय यांची योग्यता ओळखून थर्ड इंटरनॅशनलमध्ये त्यांस प्रमुख स्थान दिले. ते या जागी असतांना त्यांचा इतरांनी द्वेष केला. परंतु लेनिननें तो द्वेष आहे हे ओळखूनही त्यांना त्या जागी कायम ठेवले. त्यांचा व लेनिन याचा एका बाबतींत मतभेद झाला. परंतु, त्यांनी आपले म्हणणे International च्या सभेत मांडले हे पाहून पुष्कळांना लेनिनपुढे ‘पोर' दिसणा-या या गृहस्थाचे आश्चर्य वाटलें. लेनिनने मात्र आपला व त्यांचा असे दोन्ही प्रबंध Third International कडून मान्य करून घेतले. रॉय यांचेकडे पौर्वात्य २८