पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाई मानवेंद्रनाथ रॉय क्रांति करावयाची ही रोमांचकारी कल्पना यशस्वी करून दाखविण्या‘साठी रॉय व त्यांचे साथीदार यांनी अनेक खटपटी केल्या. | स्वतः कॉम्रेड रॉय ‘सी मटन' या नांवानें बटेव्हियांत (जाव्हांत) जर्मन वकिलाची गांठ घेण्यास दोनदां गेले होते. त्यांच्या भेटींत ठरल्याप्रमाणे ३०,००० बंदुका, ४०० काडतुसांच्या पेट्या व २ लाख रोख रुपये भरलेली एक बोट (मेव्हरिक) हिंदुस्थानांत यावयाची ठरली होती. या हत्यारांच्या साधनांनीं बंगालमध्ये क्रांतीचे युद्ध उभारावयाचे असा त्यांचा बेत ठरला होता. इतर प्रांतांतून शत्रूस मदत पोंचू नये म्हणून कोणकोणते पूल कोणी उडवून द्यावयाचे याचीही योजना त्यांनी केली होती. परंतु, सदर कटाचा सुगावा सरकारला लागला. योजलेली बोट हिंदुस्थान गांठू शकली नाहीं; व त्या वेळीं (जनतेचा पाठिंबा नसलेले) बंडही घडून आलें नाहीं. रॉय यांना पकडण्यांत आले. त्यांच्या दोन साथीदारांना सरकारने स्वर्गाचे दार मृत्यूच्या वाटेने मोकळे करून दिले. रॉय यांनी मात्र मृत्यूची छाया स्वतःवर पडते न पडते तोंच विस्मयावह रीतीने स्वतःची सुटका करून घेतली. नंतर ठिकठिकाणीं कांहीं दिवस गुप्त रीतीने राहून त्यांनी चीनमध्ये पलायन केले. चीनमध्ये सन्-यत्-सेन यांचेशी त्यांची चांगलीच दोस्ती झाली. त्यांच्याशी रॉय यांची विविध राजकीय विषयांवर चर्चा होत असे. तेथून ते फिलिपाईन्समध्ये गेले. या सर्व प्रकरणांत ध्यानात ठेवण्याजोगी विशेष गोष्ट म्हणजे एका जर्मन वकिलाबरोबर कॉम्रेड रॉय यांची झालेली मुलाखत. त्यांत रॉय यांनी त्या वकिलाला सांगितले की, ** हिंदुस्थानला स्वातंत्र्य हवें ! इंग्रज गेल्यावर जर्मनीची सत्ता हिंदुस्थानांत अंकुरित होईल अशी एकही सवलत आम्ही जर्मनीला हिंदुस्थानांत देणार नाहीं. याच वेळीं रॉय यांनी ठरविलें कीं, हिंदुस्थानला स्वातंत्र्य स्वतःच्याच प्रयत्नाने मिळविले पाहिजे. फिलिपाईन्समधून पुढे ते अमेरिकेत गेले. तेथे त्या वेळीं लाला लजपतराय होते. त्यांची व रॉय यांची दाट मैत्री झाली. दोघांच्या २७