पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाई मानवेंद्रनाथ रॉय बंगालच्या फाळणीच्या निमित्ताने सर्व भारतवर्षांत व विशेषतः बंगालमध्ये अत्यंत जोराचे आंदोलन झाले. दहशतवादी लोकां: च्या चळवळीला या वेळीं विशेषच भरती आली होती. या चळवळींत कांहीं अद्भुत गोष्टी घडल्या व किती तरी तेजस्वी नररत्ने तेजोगोलाप्रमाणे चमकून गेली. पण जे अद्यापि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी झगडत आहेत अशांमध्ये अग्रगण्य असे रॉय हे आहेत. त्यांनी १९०७ सालीं ज्या गटांत प्रवेश मिळविला त्या गटाचे प्रमुख त्याच वेळी त्यांचेबद्दल असे म्हणाले होते की, “ महान् पुढारी होण्यास लागणारे सर्व गुण त्यांचे ठिकाणीं आतांच दिसून येत आहेत. १९०७ साली पडलेल्या एका मोठ्या दरोड्यांत त्यांनी भाग घेतला असावा अशा संशयावरून त्यांना पकडले होते. पण एवढ्या लहान वयांत असलें भयंकर कृत्य करणे शक्य नाहीं असे म्हणून त्यांना सोडून देण्यांत आले. यानंतर त्यांची पकड–सोड बरेच वेळां झाली. १९०७ ते १४ च्या दरम्यान मोठमोठे दरोडे जे पडले त्या त्या वेळी त्यांना अटक झाली. पोलिसांचा ससेमिरा त्यांचेमार्गे सारखा लागला; परंतु पुरावा पुरेसा न मिळाल्याने त्यांना दरोड्यावाबतच्या खटल्यांतून सोडून द्यावे लागले. याचा अर्थ ते सरकारी पाहुणचारास मुकले असा मात्र नव्हे. राजद्रोहाच्या वगैरे आरोपांवरून त्यांना किरकोळ शिक्षा पुष्कळच झाल्या आणि क्रांतिकारक म्हणून ‘पोलिसांचा ससेमिरा कायमचाच त्यांचे मागे लागला. १९०७ सालच्या दरोड्याच्या खटल्यांतून ते दोषमुक्त म्हणून सुटले तेव्हां त्यांच्या मनाची प्रवृत्ति किंचित् कालपर्यंत अध्यात्माकडे वळली. त्यांनीं तीर्थयात्रा केल्या. पुष्कळ पुण्यस्थलांचे दर्शन घेतले व साधूच्या सहवासाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी जर त्यांना कोणी गुरु भेटला असता तर कदाचित् ते आज आहेत त्याप्रमाणे राजकारणी न राहतां योगीराज होऊन ब्रह्मानंदाचा अनुभव घेत राहिले असते. परंतु, त्यांच्या प्रवासांत त्यांना तीर्थाच्या व पुण्याच्या २५