पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य मध्ये असलेल्या भांडणाचा शेवट करण्यासाठी त्यास बोलाविलें. मक्केहून तो १६ जून ६२२ या दिवशीं पळून गेला. याच दिवसापासून महंमदाच्या संवत्सराच्या गणनेस प्रारंभ होतो. त्याच्या तत्त्वज्ञानाची भरपूर माहिती देणारे एक प्रकरण पुस्तकांत आहेच.। मॅसिडोनिया—ग्रीसच्या उत्तरेच्या प्रदेशाचे प्राचीन नांव. मॅजी–इराणांतील पुरोहित वर्गापैकी एका ज़ातीचे नांव. शहाणे लोक अशा अर्थी हा शब्द रूढ आहे. मोझेस–बायबलांतील एक व्यक्ति. त्याचा उल्लेख कुराणांतही आढळतो. युक्लिड–ख्रि. पू. ३००. सुप्रसिद्ध ग्रीक गणिती. रेनॉन-फ्रेंच इतिहासकार व तत्त्वज्ञानी. रेनोडॉट--इ. स. १५८६-१६५३. फ्रेंच इतिहासकार. विसिगथ–पश्चिम भागाच्या गॉथ लोकांना हें नामाभिधान आहे. हेजिरा–महंमद संवत्सराचे नांव. सुरुवात १६ जून ६२२ पासून. व्होल्टेअर-१६९४-१७०८. फ्रेंच तत्त्वज्ञ. सुप्रसिद्ध फ्रेंच राज्यक्रांतीला ज्या अनेकांच्या लिखाणाने चेतना मिळाली त्यांपैकी प्रमुख बुद्धिवादाचा पुरस्कर्ता. ५२ लहानमोठी पुस्तके लिहिली. 'ती राजांचा उपहासही करी व त्यांची खुशामतही करी, ही त्याचा मनोवृत्ति या त्याच्या वर्णनांत चांगलीच प्रतिबिंबित होते. हयुमबोल्ट-इ. स. १७६९-१८५९. जर्मन शास्त्रज्ञ. ११२