पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कांहीं व्यक्तींची व स्थळांची महिती टूज्यन-रोमचा बादशाहा. इ. स. ५३ ते ११७. रोमच्या साम्राज्याची व्यवस्था त्याच्या वेळीं अत्यंत चांगली होती असे म्हणतात. | टॉलमीज–इजिप्तमधील अनेक राजांची नांवें. १४ राजे या नांवाचे होते. एक राजा भूगोलवेत्ता होता. ड्रेपर-इ. स. १८११-८२. अमेरिकन शास्त्रज्ञ. इंग्लंडमधून अमेरिकेत गेला. डोनटिस्ट-कार्थेजच्या बिशपचे अनुयायी. स्वतःच्या पंथापासून फुटून वेगळे झालेले लोक. दमास्कस–सीरियांतील एक सुप्रसिद्ध शहर. नेस्टरियन- फ्रान्सच्या पश्चिमेकडील साम्राज्यांतील लोक. प्लेटो–प्राचीन तत्त्वज्ञानी व लेखक. त्याचे Republic नांवाचे पुस्तक प्रसिद्ध आहे. ख्रि. पूर्वी ३४७ मध्ये मृत्यु. फेरोआज---द्वीपकल्प. पूर्वी अलेक्झेंड्रिया या बेटाच्या ठिकाणीं होतें. बर्बर---सोमाली लँडमधील लोकांस हे नांव होते. बायझंटाईन—सध्यां कॉन्स्टॅटिनोपल आहे त्याच्या आसपासच्या प्रदेशास बायझंटाईन असे नांव होते. तेथील लोकांचे जे साम्राज्य त्यास बायझंटाइनचे साम्राज्य असे म्हणत असत. बुखारा-मध्य आशियातील राष्ट्रांचे मुख्य शहर. सध्या तेथे सोव्हिएट सरकार आहे. महंमद–मानवी इतिहासांत क्रांति घडवून आणणा-या महान् धर्माचा संस्थापक. इ. स. ५७० मध्ये कोरेश टोळींतील मध्यम स्थितीच्या कुटुंबांत त्याचा जन्म झाला. खदिज्या या श्रीमंत-वयाने त्याच्यापेक्षां १५ वर्षे मोठी–अशा एका व्यापारी स्त्रीबरोबर त्याने विवाह केला. इ. सन ६१६ मध्ये धर्मोपदेशक म्हणून प्रथम प्रकट होतांच लोकांत खळबळ उडाली. त्याला साक्षात्कार झाल्याचे व नवीन धर्मसंस्थापनेचे कार्य आपणावर आले आहे असे तो सांगत असे. आरंभीं मक्केमध्ये त्याला यश कमी मिळाले, परंतु मदिनेच्या लोकांनी आपणा १११