इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य ऑगस्टिन--सुमारे ३५४ मध्ये. 'कन्फेशन्स' व ' देवाचे नगर' या पुस्तकांचा कर्ता. तत्त्वज्ञानी म्हणून ख्याति. एरियन–एरियन या तत्त्वज्ञान्याचे अनुयायी. ओमार मृत्यु सन ६४४ मध्ये. दुसरा खलिफा. अबूबकरनंतर तो खलिफाच्या गादीवर आला. याने पॅलेस्टाईन, सीरिया व इजिप्त आपल्या वर्चस्वाखाली आणिले. जेरुसलेम येथील ओमारची मशीद यानेच बांधली. याचेही वर्णन मूळ पुस्तकांत बरेंच आले आहे. काबा मुसलमानांना पवित्र वाटणारें मक्का येथील मंदिर. त्यांतील * काळा दगड ' प्रसिद्ध आहे. कोपर्निकस-इ. स. १४७३-५२. पोलंडमधील प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ. ग्रहांच्या स्थिति-गतीसंबंधी संशोधन केले. गिबन–१७३७ ते १७९४. महान् इंग्लिश इतिहासकार. Rise and Fall of Roman Empire या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता, नष्ट साम्राज्याची चटकदार वर्णने करून त्याने आपले लेखन आदर्श करून ठेविलें आहे. गॅलिलीओ-१५६४ मध्ये जन्म. विज्ञान व खगोलशास्त्राचा पाया याने घातला. चासरोज–इराणांतील दोन सुप्रसिद्ध शूर राजांचे नांव. पहिला सुमारे इ. स. ५३१ व दुसरा ५९१ मध्ये होऊन गेला. | जैकोबाईंट-इंग्लंडचा राजा दुसरा जेम्स याचे अनुयायी. ज्युलिअस सीझर–खि. पू. १०२. इतिहासांतील अत्यंत प्रभावी व्यक्ति. रोमन साम्राज्यांतील सर्वाधिकारी. सेनापति म्हणून त्याचा योग्यता नेपोलियनच्या बरोबरीची आहे. Greatest of Dictators असे याचे वर्णन करतात. कर्मयोग्याची बुद्धि, कलावंताची भावना व विधायक द्रष्ट्याचा कल्पनाविलास या त्रिगुणांचा सुंदर मिलाफ त्याचे ठिकाणी झाला होता. त्याचाच मित्र ब्रूटस् याने त्याचा वध केला. झोरो आस्टर अगर जरदुष्ट्र–पारशी धर्माचा संस्थापक. ११०
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/104
Appearance