सदर ग्रंथांत आलेल्या कांहीं व्यक्तींची व स्थळांची माहिती अबूबकर इ. स. ५७३ ते ६३४. कोरेश टोळीपैकी एका श्रीमंत व्यापा-याच्या घरी जन्म. पहिला मुसलमान खलिफा. महंमदाचा परम मित्र. याने अरेबिया व त्याच्या शेजारच्या प्रदेशांत इस्लामचा प्रचार पुष्कळच केला. याच्या इतर गुणांचे वर्णन पुस्तकांत आले आहेच. अथेनेसियस-इ. स. २९७ ते ३७३. त्रिश्चन धर्मसुधारक. अलेक्झेंड्रिया येथे जन्म. ' तो एकटा एका बाजूस व बाकीचे जग त्याच्या उलट' अशी स्थिति ब-याच वेळा त्याच्या आयुष्यांत होती. तो दोन तीन वेळां राजाच्या गैरमर्जीमुळे हद्दपार झाला होता. अलेक्झड़िया-इजिप्तमधील सुप्रसिद्ध बंदर. असीरिया–पश्चिम आशियांतील प्राचीन साम्राज्य. अविसेना-इ. स. ९८०-१०३७. याची माहिती पुस्तकांत भरपूर आलेली आहे. अवेंपेस–मृत्यु इ. स. ११३८ मध्ये. याचीही भरपूर माहिती पुस्तकांत आहे. | अरिस्टॉटल्-ख्रि. पू. ३८४. ग्रीक तत्त्ववेत्ता व शास्त्रज्ञ. तो जिवंत ज्ञानकोश म्हणून प्रसिद्ध होता. अंदालुशिया–दक्षिण स्पेनचा भाग. आगस्टस–हा रोमन साम्राज्याचा पहिला बादशहा. ख्रिस्तपूर्व ६३ व्या वर्षी याचा जन्म झाला. सुप्रसिद्ध ज्युलिअस सीझरचा हा नातू. याने राज्यास सुरुवात केली त्या वेळीं रोम दगडाविटांचे होते आणि शेवटीं ते त्याने रत्नमाणकांचे केले असे म्हणतात. ऑक्सस अगर अमूर्या—मध्य आशियांतील अरल समुद्रास मिळणारी मोठी नदी. १०९
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/103
Appearance