इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य सामाजिक परिवर्तन मुसलमानांचा कट्टर दुष्मन हॅवेल यानेही हे मान्य केले आहे की, * मुसलमानांच्या राजकीय धोरणाचा परिणाम हिंदुस्थानावर दुहेरी झाला. जातिपद्धति अधिक कडक झाली व तिच्या विरुद्ध असंतोषही तीव्र माजला. शिवाय हिंदू समाजांतील कनिष्ठ वर्गास उत्कर्षाची मोहक आशा त्याने निर्माण केली, यात शंका नाहीं. शूद्र वर्गाच्या शृंखला तोडून त्याला ब्राह्मणाच्या बरोबरीचे स्थान मिळण्याची संधि निर्माण करून दिली. यूरोपांतील पुनरुज्जीवनाप्रमाणे येथेही बौद्धिक जीवन खळबळून टाकले. कांहीं सामर्थ्यसंपन्न व स्वतंत्रप्रज्ञ लोक निर्माण केले येथेही तेथीलप्रमाणेच शहरी संस्कृतीचा विकास झाला. तेथे फिरत्या टोळीवानास तंबू सोडावा लागला; येथे शुद्रांना खेडी सोडावी लागलो आनंदमय जीविताचा प्रारंभ या युगांतच झाला." वरील विधानांत एवढी भर घातली कीं पुरे : कबीर, नानक तुकाराम, चैतन्य, वगैरे संतांनी ब्राह्मणाच्या वर्चस्वाविरुद्ध केलेल्या प्रतिकाराचे मूळ वीज महंमदाच्या विजयाने केलेल्या सामाजिक परिवर्तनांतच आहे. नवयुगाचा संभवकाल इतिहासाच्या सत्यदर्शनाने मुसलमानांच्या विरुद्ध असलेले हिंदू मत्सरी मत चुकीचे आहे हे तेव्हांच ध्यानात येणार आहे. अशा गर मताने इतिहासाचा–सत्याचा अवमान होत असतो. आणि देशाच्या राजकीय भवितव्यासही त्याने बांध येतो. मुसलमानांपासून शहाणपण शिकून यूरोपने अभिनव संस्कृतीचे नेतृत्व मिळविले आणि या पूर्वीच्या ऋणाबद्दल कोणास वाईटही वाटत नाहीं. दुर्दैवाने इस्ला" संस्कृतीच्या वारसाचा लाभ हिंदुस्थानला फारसा झाला नाही. ५ रुज्जीवनाच्या वेदना पुनः सुरू झाल्या आहेत. अशा वेळी मानवी इतिहासांतील हे उत्कृष्ट प्रकरण स्फूतिप्रद झाल्याशिवाय राहणार नाह" १०६
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/101
Appearance