इस्लाम व हिंदुस्थान आकलन झाले तर सध्यांच्या दुर्भाग्याची मीमांसाही अधिक चांगली करतां येईल. मुसलमानांनाही अंजन-- याच्या उलट आपल्या धर्माचे इतिहासांतील मोठे कार्य काय आहे हे फारच थोड्या मुसलमानांना माहीत आहे. कुराणाच्या शिकवणुकीत बुद्धिवाद वगैरे गोष्टी बसत नाहीत, तेव्हां त्या आपल्या नव्हेतच असे अनेक मुसलमान म्हणतील. मुसलमानी धर्माला जगाच्या इतिहासांत जे संस्मरणीय स्थान आहे, त्याचे कारण मुसलमानी धर्म मूळचा सनातनी नव्हता हेच होय. तार्तरांच्या धर्मवेडामुळे किंवा पुरोहित वर्गाच्या प्रतिगामीपणामुळे कांहीं तें स्थान मिळाले नाहीं ! वस्तुतः हिंदुस्थानांत येण्यापूर्वीच त्याचे ऐतिहासिक कार्य संपले होते. ऐहिक विलासाने अवनत झालेल्या इराण व मध्य आशियांतील रानटी अनुयायी-ज्यांनी महंमदाचे संस्मरणीय आरबी साम्राज्याचा विनाश केला होता त्यांनीच हिंदुस्थानच्या भूमीवर आपला ध्वज रोविला होता; क्रांतिकारक अरबांनीं नव्हे. हिंदुस्थानमध्ये या वेळीं बुद्ध-क्रांति अयशस्वी होऊन ब्राह्मण प्रतिक्रांति यशस्वी झाली व तिच्या दडपणाखालीं असंख्य जनता चेपली गेली होती. म्हणूनच मुसलमानी संदेशाचे सर्व जनतेने स्वागत केलें. इराणी किंवा मोंगल राजांचे ठायीं अरब वीरांची सहिष्णुता, उदात्तता व उदारता बिलकूल नव्हतीच असे नाहीं, परप्रांतांतून आलेल्या लहान लहान टोळ्यांनी एवढे मोठे साम्राज्य हस्तगत करून घेतले ही एकच गोष्ट त्यांनी हिंदी समाजाची अगदी मोठी भूक भागविली हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे. मूळ क्रांतीची ज्योत मंद होऊन प्रतिक्रांतीची काजळी धरू लागली असतांही थोडासा क्रांतिप्रकाश हिंदु समाजास मुसलमान धर्माने दाखविलाच कीं, नाहीं ? मुसलमानी सत्ता हिंदुस्थानांत दृढमूल झाली याला कारण त्यांचा पराक्रम नसून इस्लाम धर्म व त्याचे प्रगतिकारक कायदे यांचा प्रसार हेच होय. १०५
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/100
Appearance