लागला होता. लोक त्याला पागल म्हणूं लागले. समाजाचीं जुनीं बंधनें तो नष्ट करूं पहात होता. प्राचीन हक्क, जुने दुष्ट व भ्रष्ट रीतिरिवाज सोडा असें सांगत होता. हा हट्टी माथेफिरू क्रान्तिकारक आहे, असें आतां लोक म्हणत व तो जाऊं लागला म्हणजे संशयाने बघत.
कोण होता तो? ते का मुहंमद पैगंबर? होय होय, तेच ते. शांतपणे रस्त्यांतून विचारमग्न होणारे व जाणारे. शिव्याशाप, निंदा सहन करीत जाणारे ते मुहंमद होते. कुरेशांच्या कुळांत, काबाच्या उपाध्यायांच्या कुळांत जन्मले होते.
■ ■ ■
पांचव्या शतकांत कुसय हा काबाचा मुख्य होता. त्यानें मक्केचा कारभार व्यवस्थित केला. निरनिराळ्या कुरेशांची घरें कशीं तरी, कोठें तरी विस्कळित बांधलेलीं होतीं. काबाचें मंदिर अति पवित्र म्हणून त्याच्या आसपास घरें बांधित नसत. परंतु कुसयनें काबाच्याजवळ वस्ती करायला त्यांना सांगितलें. काबाजवळ त्यानें जागा दिल्या. तेथें तटबंदी करून, मोहल्ले करून कुरेश राहूं लागले.
कुसयने स्वतःसाठीं एक राजवाडा बांधला. त्याचा दरवाजा उघडतांच समोर मंदिराचें सभागृह असे. या राजवाड्याला दारु-न्नदवा असें म्हणत, म्हणजे
इस्लामी संस्कृति । ४१