आईचा संबंध पत्नीच्या संबंधापेक्षां अधिक शाश्वत वाटे. जोपर्यंत पत्नी स्वेच्छेनें पत्नी म्हणून वागत आहे तोपर्यंत पति हा तिचा धनी असे. ती जणूं त्याची मिळकत दासी. तिनें त्याची आज्ञा पाळलीच पाहिजे. तिला ऐकायचें नसेल तर ती तसे करूं शकत असे. कारण कायदेकानू थोडेच होते? तिचें स्वातंत्र्य मर्यादित असे, परंतु ती त्याला सोडूं शकत असे. ते स्वातंत्र्य तिला असे. इतर देशांच्या मानानें तेथें अधिक स्वातंत्र्य होते. कारण मातृप्रधान कुटुंबसंस्था होती. कुटुंबाचें मूळ म्हणून मातेकडे पाहिलें जाई. पित्याकडे नाही.
स्त्रियांचे काम काय? कोणतेंहि धार्मिक काम त्यांच्याकडे नसे. आर्थिक व प्रजोत्पत्तीचीं अशीं दोनच कामे त्यांची असत. पतीला घरगुती कामांत मदत करणें व मुले जन्मास आणणे ही दोन कामें; धार्मिक काम नसे. कारण आत्म्यावर विश्वास नसे. पुरुषांसहि आत्मा जेथें नाहीं, तेथे स्त्रियांना कोण देणार?
नागर अरब व वाळवंटांतील बेदुइन या दोघांची स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टि निराळी होती. बेदुइनांमध्ये स्त्रियांविषयींची दाक्षिण्यवृत्ति होती. तो उदारतेनें त्यांच्याकडे पाही, कवींच्या काव्यांत स्त्रियांविषयीं उदारता आहे, परंतु कवि हे जात्याच दिलदार व उदार असतात. इतरांपेक्षां सहृदय व संस्कारी असतात. परंतु बेदुइन हा आपल्या प्रेयसीला मालकीची वस्तु मानीत नसे, तर पूजनीय देवता मानी! अरक्षित कुमारिकांना वाळवंटी वीरांनीं कसें सभ्यतेनें व दाक्षिण्यानें वागविले याचीं काव्यांतून अनेक उदाहरणें आहेत. सुधारलेल्या लोकांत ध्येय व आचार यांत अंतर असतें. परंतु वाळवंटांतील अरबांचें तसें नसे. ध्येयानुरूप त्यांचा आचार असे. वाळवंटांतील अरब महिला निराळीच होती. तिचें जनानखानी जीवन नसे. ती मोकळी असे. ती अपरिचित पुरुष- पाहुण्यांचे स्वागत करी. कोणी संशय घेत नसे. ती स्वतःच्या चारित्र्यास प्राणाहून जपे. दुसरा कोणी वाली जवळ असावा असे तिला वाटत नसे. ती भित्री नसे. पुरुषांना जसें शौर्य-औदार्य, तसें स्त्रीला सतीत्व, पवित्र चारित्र्य! त्या काळांत व्यभिचार म्हणजे न धुतला जाणारा कलंक मानला जाई. पत्नी पतीला शौर्याचीं कृत्ये करायला प्रेरणा देई. विजयी होऊन तो येई व त्याची स्तुति करी. या स्तुतीचा अरब मोठा भोक्ता असे. अंताराची गोष्ट सुप्रसिद्ध आहे. स्त्रियांच्या रक्षणार्थ जखमी झाला तरी तो उभा होता. "मी या खिंडीच्या
२४ ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/३८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
