असा हा शांत, स्वस्थ अरेबिया. आपल्या मुक्या निःस्तब्ध गूढतेंतून आतां प्रकट होणार होता. एक हजार वर्षेपर्यंत परकीयांच्या दृष्टिला दृष्टि न देणारा हा विजनवासी, एकान्तप्रिय अरब साऱ्या जगाचे डोळे स्वतःकडे ओढून घेणार होता. स्वतःच्या प्रेरणेनें अरबस्थान स्वतःच्या जीवनावरील पडदा फाडून देणार होतें. हे शांत स्तब्ध लोक साऱ्या जगांतील राज्यें, साम्राज्ये स्वतःच्या पायांपाशीं आणावयास उभे राहिले. आपल्या किल्ल्यांतून ते बाहेर पडले.
साराच अरेबिया अज्ञात होता असें नाहीं. नकाशांत जरा पहा. आशियाच्या उजव्या कानांतील हा सुंदर लोलक जरा पहा. दक्षिणेस हिंदी महासागर, पूर्वेस इराणचे आखात, पश्चिमेस तांबडा समुद्र व उत्तरेस सीरियाचा वैराण भाग. अरबस्थानाचे सामान्यतः दोन भाग पाडतां येतील. मधला भाग मध्य अरबस्थान. हा केवळ वालुकामय प्रदेश आहे. आणि या वालुकामय प्रदेशाभोंवतीं समुद्राच्या तिन्ही बाजूंनी असणारा भाग हा दुसरा भाग. तसे इतर पुष्कळ भाग आहेत. हवा, पाणी, सुपीकपणा लोकांच्या चालीरीती, एवढेच नव्हे तर तोंडवळे यांतहि फरक आहेत. अरबस्थानच्या उत्तरेचा डोंगराळ मुलूख यांत अलहीरा हा भाग येतो. याला गत्सान असेंहि म्हणत. या भागाला रोम व इराण यांचं प्रभुत्व बहुधा आलटूनपालटून पत्करावेच लागे. पश्चिमेकडचा भाग हा सर्वात महत्त्वाचा आहे. या भागाला हिजाज असें नांव आहे. या भागांतच मदिना हें प्रसिद्ध व पवित्र शहर आहे. त्याचें इस्लामपूर्व नांव यसरिब असें होतें. मक्का शहर याच भागांत, मक्केची यात्रा करणारे हाजी लोक ज्या बंदरांत उतरतात तें जिद्दा बंदरहि याच भागांत. मक्का, मदिना हीं शहरे समुद्रापासून आंत आहेत. तांबड्या समुद्राच्या पूर्व किनाऱ्याकडे पाहा. लाल दगडाचे सुळके रागाने जणुं समुद्रांत घुसत आहेत असें येथें दिसेल. परंतु लाल लाटांच्या माऱ्याला भिऊन हे पहाड मांगें मांगें जात आहेत. चला त्यांच्या पाठोपाठ. किनाऱ्याकडून या पहा एका पाठीमागून एक अशा डोंगरांच्या, टेकड्यांच्या रांगा आहेत. आणि या टेकड्यांच्या अधूनमधून एखादी हिरवळीची दरी आहे. त्या हिरवळीच्या जागीं अरबांची एखादी वसाहत असायची. तेथे अरब आपल्या शेळ्या मेंढ्यांना पाणी पाजत आहेत असें दिसे. पावसाच्या पाण्यानें बनणारे प्रवाह तेथे टिकत नसत. तप्त भूमींत लगेच शोषले जात. परंतु वाळूत घुसलेल्या या पाण्यांतून मध्येच एखादा झरा
६ ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/२०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
