Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 असे हे प्रेमधर्मी मुहंमद होते. जे अनाथ, परित्यक्त असत ज्यांना कोणी नसे, जे दुःखी व रंजले गांजलेले असत ते मुहंमदांजवळ येत, दुःखें सांगत. मुहंमद त्यांच्याजवळ बसत, बोलत, चौकशी करीत. बायका आपल्या निर्दय पतींच्या तक्रारी घेऊन येत. अगदीं गरीब गुलामहि त्यांच्याकडे येत व त्यांचा हात धरून त्यांना आपल्या धन्याकडे नेत व म्हणत, "सांगा या आमच्या मालकांना दोन शब्द. आम्हांला नीट वागवायला सांगा. मुक्त करायला सांगा." गरीब झोंपड्यांतून ते जायचे. सर्वांची विचारपूस करायचे. सर्वांचे अश्रु पुसायचे, जवळ असेल तें द्यायचे.

回 回 回





त्यांच्या बायकांच्या लहान लहान झोपड्या अलग अलग अशा एका ओळीनं होत्या. या झोपड्या साध्या, ताडपत्र्यांनी आच्छादिलेल्या चिखला- मातीच्या अशा होत्या. मुहंमद स्वतः घर झाडीत. कधीं पाहुणे आले तर त्यांना आधीं जेवण देत. कोणी गरीब आला तर त्याला बरोबर जेवायला- बसवीत. ज्यांना घरदार नसे ते मुहंमदाच्या घराबाहेर एक बांक असे त्यावर

इस्लामी संस्कृति । १५१