Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाठविले. तें पत्र वाचून खुश्रू रागावला. हा कोण बरोबरीच्या नात्यानें लिहिणारा, असें म्हणून त्यानें पैगंबरांच्या पत्राचे तुकडे केले! तें ऐकून मुहंमद म्हणाले, "त्याच्या राज्याचे असेच तुकडे होतील!" आणि पुढें लौकरच ती भविष्यवाणी खरी ठरली. ग्रीक सम्राट हिरेक्लिअस यानें पैगंबरांच्या दूतास अधिक चांगल्या रीतीने वागविलें. पैगंबरांनी पाठविलेल्या दूताचें नांव अबु सुफियान.
 "तुमचे पैगंबर काय शिकवतात? " ग्रीक सम्राटाने विचारलें.
 "एका ईश्वराची पूजा करा. जुन्या मूर्तिपूजेस रजा द्या. गरिबांसाठी उत्पन्नाचा कांही भाग देत जा. सत्यानें रहा. पवित्र रहा. दुर्गुणांपासून दूर रहा. पापांपासून, घाणीपासून दूर रहा. असें पैगंबर शिकवतात." अबु सुफियाननें उत्तर दिलें.
 "त्यांचे अनुयायी वाढत आहेत का?"
 "हो वाढत आहेत. आणि जो एकदां त्यांचा होतो, तो पुन्हां त्यांना कधीं सोडित नाहीं."
 या हिरेक्लिअसचा एक मांडलिक राजा दमास्कसजवळ रहात असे. त्याच्याकडेहि इस्लामचा दूत गेला. परंतु त्याचा दुसऱ्या एका मातबराकडून खून झाला! यामुळेच पुढे इस्लामचं व ख्रिस्ती राष्ट्रांचे युद्ध सुरू झालें.
 ज्यूंचा पराजय झाला तरी आसपासच्या ठिकाणाहून ते त्रास देत असत. मदिनेपासून तीन चार दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर अत्यंत तटबंदीच्या बळकट ठिकाणीं बनी नझीर व कुरेझा या ज्यू जमाती राहूं लागल्या होत्या. तेथें मजबूत किल्लेकोट होते. या जागेस खैबर म्हणत. खैबर म्हणजे तटबंदीची जागा. खैबरचे ज्यू मुहंमदांवर जळफळत होते. पैगंबरांस खाऊं कीं चावूं करीत होते. या ज्यूंनीं वेदुद्दनांच्या एका जमातीशीं संयुक्त फळी करण्याचे ठरविलें. बेदुइनांचें शौर्य-धैयं मुसलमानांस माहित होतें. संयुक्त फळी होऊन बेदुइन व ज्यू यांचे संयुक्त सैन्य मदिनेवर चालून येण्यापूर्वीच मुसलमानांचे १४०० लोकांचे सैन्य खैबरवर चालून गेलें! ज्यूंना कोणाचीहि मदत आली नाहीं. किल्ल्यापाठीमागून किल्ला पडूं लागला. शेवटीं ज्यू शरण आले. ज्यूंना त्यांची शेतीवाडी, घरदार सारें ठेवलें गेलें. त्यांचं धार्मिक स्वातंत्र्यहि राखण्यांत आलें. परंतु अतःपर त्यांचें रक्षण मुस्लिम सत्ता करणार, यासाठी ज्यूंनीं कर द्यावे असें ठरलें. ज्यूंची जंगम

इस्लामी संस्कृति । ११९