मुहंमद अशा रीतीनें शांति प्रस्थापित होते. लुटणाऱ्यांचा बंदोबस्त करीत होते. प्रेमानें, कठोरपणानें सर्वास जिंकित होते. मक्का सोडून त्यांना आतां सहा वर्षे झालीं होतीं. त्यांचे शब्द ऐकायला दूरदूरचे लोक येऊं लागले. त्यांचा सल्ला विचारायला येऊं लागले. रोजच्या जीवनांत कसें वागावें तें विचारण्यासाठीं येऊ लागले. मुहंमद नाना विषयांवर सांगत. त्यांतून इस्लामी धर्माच्या स्मृति तयार होऊं लागल्या. नीतिशास्त्र, कायदेशास्त्र तयार होऊं लागलें, मुहंमदांबरोबर जे मक्का सोडून आले होते, तीं आपली घरें, त्या टेकड्या सारे सोडून आले होते, त्यांना पुन्हां एकदां ती जन्मभूमि पहावी, असें वाटूं लागलें. मुहंमदांसहि मक्केची फिरून फिरून आठवण येत होती. तें परंपरेचें पवित्र मंदिर काबा पाहण्याच्या इच्छेनें सारे उत्कंठित झाले होते. काबा सर्व अरबस्थानचें होतें. कुरेश केवळ तेथले पंड्ये होते. काबाच्या दर्शनास शत्रुहि आला तरी कुरेश कायद्यानें त्याला बंदी करूं शकत नव्हते.
आणि यात्रेचा महिना जवळ आला. मक्केस जाऊन पवित्र स्थानें पहाण्याचा आपला इरादा पैगंबरांनी जाहीर केला. सातशे मुसलमान निःशस्त्र असे निघाले. या सातशेत अन्सार, मुहाजिरीन सारे होते. परंतु कुरेशांचा वैराग्नि विझला नव्हता. ते मक्केपासून कांहीं अंतरावर सशस्त्र आडवे आले. परंतु नंतर मांगें हटत हटत मक्केत जाणारे सारे रस्ते रोखून बसले! मुहंमदांनी त्यांच्याकडे एक प्रतिनिधि पाठवला. परंतु कुरेशांनी त्याला नीट वागवलें नाहीं. मुहंमद व
इस्लामी संस्कृति । ११७