Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वास्तविक मुहंमदांचा किती प्रेमळ स्वभाव! अपरंपार करुणेचे ते सिंधु होते. कोठेहि कोणी दुःखी दिसला तर ते द्रवत, त्यांचे डोळे भरून येत. अरब लोक मर्द, परंतु मुहंमद तर स्त्रीप्रमाणें रडत! एखादा अनुयायी मेला, मुलें मेली तर त्यांचे डोळे भरत. 'बायकी स्वभावाचा' असें त्यांचे शत्रु त्यांना म्हणत. अशा त्या कारुण्यमूर्तीला परिस्थितीमुळे हातीं शस्त्र धरावें लागलें! स्वतःच्या लोकांच्या संरक्षणासाठी, बाल्यावस्थेतील नवराष्ट्राच्या रक्षणासाठीं ते संघटित सेना उभारूं लागले. आपल्यावर एकदम हल्ला होऊं नये म्हणून पुढे जाऊन हल्ले करावे लागले. ते टेहळणी करणाऱ्या तुकड्या पुढे पाठवीत. कारण अरब रात्री किंवा अगदीं उजाडत अचानक हल्ले करतात.
 मक्कावाले मदिनेच्या जवळ मुसलमानांचीं फळझाडें तोडीत, लुटालूट करीत आले. शेळ्यांमंढ्यांचे कळप त्यांनी लांबविले. अबुजहल एक हजार लोक घेऊन मदिनेवर चालून आला. त्यांचा एक तांडा युद्धाची सामुग्री घेऊन येत होता. त्याचे रक्षण करणें व मदिनेंतील मुसलमानांचा नाश करणें, हें अबू जहलचें काम होतें. मदिनेवर अबू जहल येत आहे हें मुसलमानांस आधींच कळलें. म्हणून ते बाहेर बद्रची दरी होती तेथें जाऊन बसले. तीनशे तेरा निवडक लोक घेऊन मुहंमद तेथे तयार होते. अबु जहल येत होता. मुहंमदांनी आकाशाकडे हात केले व म्हटले, "प्रभो, तूं मदतीचे दिलेले आश्वासन विसरूं नकोस.
१०२ ।