पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८६ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

त्या सालच्या जानेवारींत संभाजीमहाराजांचें देहावसान झालें. तें वर्तमान अनूबाईनीं पेशव्यांस टाकोटाक लिहून पाठविलें. ते त्यावेळीं वर लिहिलेल्या स्वारीस नुकतेच निघाले होते. आतां पुढें करवीरच्या राज्याचे काय करावें, असा विचार त्यांच्या मनांत घोळूं लागला.

 राज्यांत सरंजामदार व सरदार वगैरे आहेत त्यांचे इतमाम व सरंजाम चालविण्याविषयी व संभाजीमहाराजांचे राज्य निराळे राखण्याविषयी जरी पेशव्यांनी पूर्वी शाहूमहाराजांजवळ कबूल केलें होतें, तरी राज्यांतले फंदफितूर मोडून त्याचें रक्षण करण्याची व तें वृद्धिंगत करण्याची जबाबदारी त्यांचे शिरावर होती. या दृष्टीनें पहातां जे आपले प्रतिस्पर्धी व द्वेषी असतील त्यांचें सामर्थ्य कमी करावें म्हणून त्यांनी वेळोवेळी उद्योग केला होता याचें आश्चर्य वाटत नाही. प्रतिनिधींकडे मुलूख होता त्यापैकीं निदान तीनचतुर्थांश तरी मुलूख त्यांनी आजपर्यंत काढून घेतला होता. दाभाडे सेनापति म्हणजे अर्थात् त्यांचे मुतालीक गायकवाड यांजपासून गुजराथेचा अर्धा अंमल त्यांनीं हिसकून घेतला होता. फत्तेसिंग भोंसले यांचीही जहागीर त्यांनीं बरीच कमी केली होती. नागपूरकर भोंसल्यांचे वाटेस ते आजपर्यंत गेले नाहीत याचे कारण ते भोंसले पेशव्यांशीं आजपर्यंत पूर्ण मिलाफानेंच वागत आले होते.

 महाराज मरण पावले असतां त्यांच्या राण्या परराज्यांशीं संधानें लावून व राज्यात अंतःक्षोभ करून कसा बखेडा करितात याची अद्दल नानासाहेबांस यापूर्वी चांगलीच घडली होती. संभाजीमहाराज हयात होते तोपर्यंत त्यांची अमर्यादा पेशव्यांनीं कधी काडीमात्र केली नाहीं. परंतु ते मरण पावल्यावर जिजाबाईंचे हातांत एवढें राज्य राहूं न देण्याचा त्यांनीं निश्चय केला. असें करिताना आपण पूर्वी