बुडवावें, आम्ही तुमच्या पुतण्यास पेशवाईची वस्त्रें देतों, असे ताराबाईंचे रामदासपंताशीं बोलणें होतें ! संभाजी महाराजांचा व विशेषेंकरून त्यांचें कुटुंब जिजाबाई यांचा द्वेष नानासाहेबांविषयीं कमी नव्हता. त्यानीं गेल्या वर्षी पेशव्यांच्या घरांतच भाऊबंदकीचा वणवा पेटविण्याचा उद्योग केला होता. राज्याचा कुलअखत्यार चालवावयाचा तर विस्तवाच्या या तीन ठिणग्या अस्तनींत बाळगणें पेशव्यांस भागच होतें. तत्रापि या ठिणग्यांनीं प्रदीप्त होऊन आपला नाश न करावा एवढ्या पुरती तजवीज पेशव्यांस पहावयाची होती. ताराबाई पेशव्यांस न जुमानितां साताऱ्याभोंवतालच्या प्रांतांत करडा अंमल बसवून वसूल घेत होत्या. पण त्यापेक्षां अधिक उपद्रव त्यांच्यानें तूर्त होण्याजोंगा नव्हता. राहतां राहिले संभाजीमहाराज व जिजाबाई. त्यांच्याच दर्शनाकरितां सांप्रत पेशवे करवीरास गेले होते व त्यांबरोबर अनूबाईंही गेल्या होत्या.
पेशवे आतां राज्याचे कुलमुखत्यार झाले आहेत, आपण त्यांस बुडविण्याकरितां कारस्थानें केलीं त्याअर्थी शाहू महाराजांच्या सनदेस धाब्यावर बसवून ते आपलें संस्थान घेतात कीं काय, ही संभाजीमहाराजांस चिंता होती. पण पेशव्यांची गांठ पडताच ती त्यांची चिंता पार नाहींशी झाली. या भेटींत तुमचें राज्य तुम्हाकडे चालवूं असें पेशव्यांनी संभाजीमहाराजांजवळ कबूल केलें असेलच. त्यांत कांहीं विशेष नाहीं. पण तुम्हास औरस पुत्र न झाला तरीसुद्धां दत्तक देववून तुमचें राज्य चालवूं, असें कांहीं तरी वचन पेशव्यांनी संभाजीमहाराज व जिजाबाई यांस या प्रसंगी दिले असावें असें वाटतें. पुढे सात वर्षांनी संभाजीमहाराज मृत्यू पावल्यावर त्यांचे राज्य जप्त करण्याचा पेशव्यांनी यत्न केला तेव्हां जिजाबाईंनीं त्यांवर बेइमानाचा आरोप करून त्वेषाची चडफड केली आहे, त्यावरून असलें कांहीं तरी वचन या वेळी पेशव्यांनी दिलें असावें हेंच ठाम मत
१०
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/८३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७३ )
नारायणराव व्यंकटेश.