पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(६०)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

च्या किल्ल्यावर रहात होत्या त्यांच्या हातांत सर्व अधिकार जाऊन आपणास कैदेंत रहावें लागेल हें त्यांस मोठें भय होतें. "आपणास व संभाजीमहाराजांस पुत्र नाहीं व होण्याची आशा नाहीं, रामराजांची स्थापना केली तर त्यांस संतति होऊन पुढें वंशपरंपरा तरी कायम रहाण्याचा संभव आहे व गादीवर वास्तविक हक्कहीं त्यांचाच आहे, त्यांस एकीकडे सारून दुसराच कोणी दत्तक घ्यावा तर आपण मेल्या- नंतर रामराजांस हातीं धरून कोणी बलिष्ठ सरदार अगर परकी राजे राज्यांत बखेडा करितील, याकरितां रामराजांसच गादी द्यावी." हे शाहूमहाराजांचे विचार योग्य होते. शिवाय पूर्वी रामराजांच्या वडिलांस करवीरच्या गादीवरून काढण्यांत व त्यामुळें त्यांस स्वतःस अज्ञातवास भोगावयास लावण्यांत शाहूमहाराजांचे अंग होतें, त्याअर्थी त्यांस त्यांनी स्वकीय राजपद देऊन झालेल्या अन्यायाचें परिमार्जन न्यायाचेंच होतें. पण या गोष्टी सकवारबाईंच्या मनास पटत नसल्यामुळें दत्तक घेण्याविषयीं त्यांचा आग्रह वृद्धिंगत होत गेला; व मुळीं रामराजेच नाहींसे करून टाकले म्हणजे तंटाच मिटला, असें मनांत आणून त्या त्यांचें गुप्त रहाण्याचें ठिकाण धुंडावयाच्या उद्योगास लागल्या!
 बिचाऱ्या रामराजांच्या जन्मास कोणची खडतर वेळ लागली होती कीं; जेणेंकरून त्यांचें सर्व आयुष्य हालविपत्तींत, अज्ञातवासांत अथवा कैदेंतच जावें! त्यांचा जन्म झाला तेव्हां त्यांचे चुलते संभाजीमहाराज व तत्पक्षीय लोक हे त्यांच्या प्राणाचा बळी घेण्यास टपलेले होते, म्हणून ताराबाईंनीं त्यांस बावडयास पंतअमात्यांकडे गुप्तरूपें पाठवून दिलें. ताराबाई व शिवाजीमहाराज यांस कैदेंत ठेवून संभाजीमहाराजांस गादीवर बसविण्याच्या मसलतींत रामचंद्रपंत अमात्य नसावे, या गोष्टीला हें एक उत्तम प्रमाण आहे. असो, अमात्यांच्या कुटुंबांतल्या