पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/६९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(५९)
नारायणराव व्यंकटेश.

आमचें मुख्य कारण या गोष्टींची हकीकत डफसाहेबानीं दिली आहे ती पूर्वग्रहांनीं दूषित व अपुरी असल्यामुळें त्यांचें यथातथ्य स्वरूप दाखवावें एवढेंच आहे.
  एकाद्या माणसाच्या हातांत सामान्य अधिकार असला तरी तो अधिकार आपले मागें आपल्या कुटुंबांतील व आप्त स्वकीय माणसांनीं उपभोगावा हें त्यास साहजिकच वाटत असतें. असें असतां आपल्या वाडवडिलानीं तलवारीच्या जोरावर मिळविलेला मराठी साम्राज्याचा मुख्य अधिकार शाहूमहाराजानीं आपण होऊन पेशव्यांच्या हवालीं कसा केला हे पुष्कळ लोकांस गूढ वाटतें. पण त्या महाराजांच्या सबंध कारकीर्दीचें राजकीय दृष्टया पर्यालोचन केलें, व त्यांच्या गृहस्थितीचा व स्वभावाचा विचार केला,म्हणजे याचें काहीं आश्चर्य वाटेनासें होतें!
  शाहूमहाराजांस संतान नव्हतें. एक मुलगा त्यांस झाला होता परंतु तो अल्पवयांतच वारल्यामुळें त्यांच्या मनास अतिशय उद्विग्नता होऊन कांही वर्षे भ्रमिष्टपणाही आला होता. पुढें त्यांची बुद्धि शाबूद झाली, पण तेव्हांपासून प्रपंचाविषयीं त्यांच्या मनास जी उदासीनता आली ती शेवटपर्यंत गेली नाहीं. त्यांस सकवारबाई व सगुणाबाई अशा दोन स्त्रिया होत्या त्यांस अनुक्रमें थोरली व धाकटी धनीण अशी नांवें होतीं. थोरलीचा स्वभाव मानी, आग्रही व उग्र होता, त्यामुळें महाराजांचे व तिचें फारसें पटत नसे व त्यांचा काय तो सारा जीव धाकटया धनिणीवर होता. ती धाकटी धनीण वारली तेव्हांपासून त्यांच्या मनास धक्का बसून ते खचत चालले. आपणास पुत्र नाहीं त्या अर्थी दत्तकपुत्र न घेतां रामराजांसच गादीचे वारस करावें हा बेत त्यांच्या मनांत बरेंच दिवस घोळत होता, पण तो सकवारबाईंस बिलकुल पसंत नव्हता. रामराजे गादीचे मालक झाले तर त्यांच्या आजी ताराबाई साताऱ्या-