पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(५० )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास

घेतली. त्यायोगानें महाराज प्रसन्न झाल्यासारखे दिसले." या लिहिण्याचा भाव असा दिसतो कीं, आपण प्रत्यक्ष महाराजांचे सरदार नसून पेशव्यांचे सरदार आहों; सबब महाराजांची भेट घ्यावयाची ती परस्पर न घेतां आधी पेशव्यांच्या मुलास भेटून त्याच्या द्वारें महाराजांची भेट घ्यावी, असें व्यंकटरावांस वाटल्या वरून त्यानीं महाराजांस सामोरे न येण्याविषयीं सुचविलें. गॉर्डन् याच्या लिहिण्याचा दुसरा कांहीं अर्थ होत नाहीं व वर जो अर्थ दिला आहे तोच जर खरा अर्थ असेल तर त्यांतही तो साहेब चुकला आहे. कारण कीं, इचलकरंजीकर हे पेशव्यांचे सरदार नसून महाराजांचे सरदार आहेत हें प्रसिद्ध आहे. राजपथक्यांत त्यांची गणना आहे. सामान्य पथक्यांत त्यांची गणना नाहीं, महाराजांची भेट घेण्यास व्यंकटरावांस कदाचित मुहूर्त नसेल, किंवा कदाचित् मानमरातबाची कांहीं भानगड असेल, किंवा दुसरें कांहीं कारण असेल. शाहूमहाराजांनी सर्व संस्थान इनाम देऊन जर व्यंकटरावांचें परोपरीनं कल्याण केले होतें व सरदारी देऊन त्यांस नांवलौकिकास चढचिलें होतें, तर ते आपण शाहूमहाराजांचे ताबेदार नाहीं असें कसें म्हणतील ? शिवाय ज्यास सामोरे जावयाचें तो आपला ताबेदार असला तरच सामोरे जावें, नाहीं तर जाऊं नये, हा संप्रदाय कोठेंही ऐकिवांत नाहीं. तात्पर्य हें सारें लिहिणे असंबद्ध आहे. गॉर्डन् हा आणखी असे लिहितो कीं, “ तारीख २१ रोजी गोंव्याकडून कांहीं मंडळी आली. त्यांनी बातमी आणिली कीं पोर्च्युगीज लोकांनी मराठ्यांपासून आपला किल्ला बळजबरीनें परत घेतला व त्यांचे नऊशें लोक मारिले. पूर्वीच्या ठरावाप्रमाणें पैका देण्याची त्यानीं आतां चुकवाचुकव चालविली आहे." पण ही अफवासुद्धां निराधारच होती. कारण कीं, व्यंकटराव इकडे आल्यावर पोर्च्युगीज