Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४९ )
व्यंकटराव नारायण.

राजहंसगड हे किल्ले व तालुके व्यंकटरावांनी या स्वारींत घेतले. या स्वारींत व्यंकटरावांस पराकाष्ठेची मेहनत पडली. पावसाळा समीप आल्यामुळें गोंवें प्रांती आपली फौज छावणीस ठेवून व्यंकटराव परत आले.
 त्या वेळीं शाहूमहाराज मिरजेच्या किल्यास वेढा घालून बसले होतें. त्यांचे लष्करांत व्यंकटराव चारशें स्वारांनिशीं येऊन दाखल झाले. खुद्द महाराजांची स्वारी त्यांस सामोरी गेली होती. त्या वेळीं इंग्रजांकडून मुंबईहून गॉर्डन् नांवाचा एक सरदार शाहूमहाराजांकडे वकिलीस आला होता. त्याच्या लिहिण्यावरूनच व्यंकटराव शाहूमहाराजांच्या भेटीकरितां आले होते ही माहिती दिली आहे. गॉर्डन् यानें त्या वेळची अशी एक बातमी लिहून ठेवली आहे कीं, ‘गोंवेकर पोर्च्युगीज लोकांनी सहा लक्ष रुपये देण्याचे कबूल करून मराठयांशी ( म्हणजे अर्थात् व्यंकटरावांशीं) समेट करून घेतला. त्यांपैकी त्यांनीं पस्तीस हजार रुपये रोख व एक लक्ष पस्तीस हजार रुपये किमतीचीं ताटे तबकें वगैरे चांदी दिली. सर्व रकमेचा फडशा होईपर्यंत मराठी फौज गोंव्याच्या आसपास रहावयाची आहे व गोंवेकरांनीं तिच्या खर्चाकरितां दरमहा दोन हजार रुपये देण्याचें कबूल केलें आहे". त्यावेळच्या इंग्रजांस इकडल्या रीतीभातींचें व समाजस्थितीचें ज्ञान नव्हते. यामुळे गॉर्डन् याच्या लिहिण्यांत आणखी कांहीं गमतीच्या चुका झालेल्या आहेत. तो लिहितों कीं, ‘‘ व्यंकटराव आल्याचें वर्तमान येतांच शाहूमहाराज त्यांस सामोरे जावयास निघाले, परंतु व्यंकटराव बोलले कीं, मी कांहीं तुमचा ताबेदार नाहीं. त्यावरून शाहूमहाराज त्यांस सामोरे न जातां शिकार खेळावयास गेले. पण हें वर्तमान जेव्हां बाजीराव पेशव्यांच्या मुलानें ऐकिलें तेव्हां त्याने व्यंकटरावांकडून महाराजांस भेटण्याचें कबूल करविलें व झालेली चूक माफ करून