होईल तर आपण गोंव्यावर स्वारी करितों. तेव्हां महाराजांस ती गोष्ट मान्य होऊन त्यांनीं मोठी फौज बरोबर देऊन स. १७३८व्यंकटरावांस सन १७३८ त गोंव्याच्या स्वारीस रवाना केलें. तिकडे गेल्यावर व्यंकटरावांनीं वाडीकर सावंत व सोंदेकर संस्थानिक यांजकडे राजकारण करून त्यांस आपणाकडे मिळवून घेतलें व गोवेकरांवर जरब बसवून उत्तर कोंकणांत कुमक पाठविण्याचे रहित करणे त्यांस भाग पाडिलें. पांच सहा महिने राहून पावसाळ्याचे प्रारंभीं ते फौजेसह परत आले.
पुढच्या सालीं व्यंकटरावांची पुनः त्याच स्वारीवर नेमणूक झाली. त्या वेळीं राणोजी घोरपडे यांनीं त्यांस लाट हा गांव इनाम दिला. त्या वर्षाच्या मार्च महिन्याचे प्रारंभीं व्यंकटराव गोंव्याच्या हद्दीवर जाऊन पोहोंचले. प्रथम त्यांनी कोट फोंडा व मर्दनगड हे किल्ले काबीज केले. नंतर गोंव्याजवळ साष्टी व बारदेश म्हणून पोर्च्युगीज लोकांचे दोन तालुके आहेत त्यांवर स्वारी करून ते घेतले स. १७३९व खुद्द गोंव्यासच वेढा घालण्याचा डौल घातला. उत्तर कोंकणांत आतां पोर्च्युगीज लोकांचे वसई एवढें एकच ठाणें राहिलें होतें त्यासही पेशव्यांचे बंधु चिमाजीआपा यांनीं वेढा घालून तें जेंरीस आणिलें होतें. तिकडे कुमक पाठविण्याविषयीं गोंव्याच्या गव्हर्नराचा जीव तळमळत होता, पण व्यंकटराव अगदीं गोंव्याजवळ येऊन ठेपल्यामुळें आतां खुद्द गोंवेच कसें बचावलें जातें ही त्यास काळजी पडली. अर्थात त्याजकडून वसईवाल्यांस कुमक न पोंचल्यामुळें त्यानी ते ठाणे निरुपायानें चिमाजीआपांचे हवालीं केलें. गोमांतकाच्या सरहद्दीस लागून तळ कोंकणांत व घांटमाथ्यावर कोट सुपें व त्याच्या आसपासचीं किरकोळ ठाणीं कोट सांगें व जांबळी पंचमहाल व
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/५८
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(४८)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.