पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/५२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४२ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.


  कलम १. इलाखा वारूण महाल तहत संगम दक्षिणतीर कुलदुतर्फा मुलूख दरोबस्त देखील ठाणीं व किल्ले तुम्हांस दिले असत.
  कलम २. तुंगभद्रेपासून तहत रामेश्वरदेखील संस्थानें निम्मे आम्हांकडे ठेवून निम्मे तुम्हांकडे करार करून दिलीं असत.
  कलम ३. किल्ले कोपळ तुम्हांकडे दिल्हा त्याचा मोबदला तुम्ही रत्नागिरी आम्हांकडे दिला.
  कलम ४. वडगांवचें ठाणें ( किल्ला ) पाडून टाकावें.
  कलम ५ . तुम्हांशीं जे वैर करितील त्यांचें पारिपत्य आम्ही करावें. आम्हाशी वैर करितील त्यांचें पारिपत्य तुम्ही करावें. तुम्ही आम्ही एक विचारें राज्याभिवृद्धि करावी.
  कलम ६. वारणेच्या व कृष्णेच्या संगमापासून दक्षिणतीर तहत निवृत्तिसंगम तुंगभद्रपावेतों दरोबस्त देखील गड ठाणीं तुम्हांकडे दिलीं असत.
  कलम ७. कोकणप्रांत साळशीपलीकडे तहत पंचमहाल अकोलेंपावेतों दरोबस्त तुम्हांकडे दिले असत.
  कलम ८. इकडील चाकर तुम्ही ठेवूं नये. तुम्हांकडील चाकर आम्ही ठेवूं नये.
  कलम ९. मिरजप्रांत विजापूरप्रांतींचीं ठाणीं देखील अथणी तासगांव वगैरे तुम्ही आमचे स्वाधीन करावीं.
 येकूण नऊ कलमें करार करून तहनामा लिहून दिल्हा असे. सदरहूप्रमाणें आम्ही चालूं. यास अंतराय होणार नाहीं.
 याप्रमाणे हा नऊ कलमांचा तहनामा आहे. खुद्द शाहू व संभाजीमहाराज़ या तहाला कितपत महत्व देत होते हें त्यांच्या वर्तनावरूनच दिसून येतें. कलम तीन, पांच व आठ यांखेरीज हा तह