पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/४५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(३५)
व्यंकटराव नारायण.

कापशीकर सेनापतींच्या हाताखालीं चाकरी करावी असें ठरलें होतें. परंतु आतांच्या जाबत्यामुळें त्यांचा कापशीकर सेनापतीशीं व त्यांबरोबरच त्यांचे धनी करवीरकरमहाराज यांशीं अजीबात संबंध तुटला;व ते शाहूमहाराजांचे स्वतंत्र सरदार झाले.
  व्यंकटराव व अनूबाई हीं दोघंहीं आतां वयांत आलीं होती. वर्षातून बरेच दिवस त्या उभयतांनीं पुण्यांत आपल्याजवळ रहावें अशी पेशव्यांस इच्छा होणें साहजिक होतें. त्यामुळें त्यानीं सन १७२२ सालीं व्यंकटरावांस रहाण्याकरितां पुण्यांत वाडा बांधून दिला. आणि तेथच्या संसाराच्या सोईकरितां मौजे वडगांव तर्फ चाकण हा सबंध गांव व पर्वतीनजीकचा बाग व हडपसर येथील बाग त्यांस इनाम करून दिला.
  याप्रमाणें पुण्यांत राहण्याची सोय झाल्यामुळें व्यंकटराव वर्षातून कांही दिवस तेथे रहात असत. त्यांस दोन अपत्यें झालीं तीं पूर्ववयांतच झालीं. पहिली कन्या वेणूताई व दुसरा पुत्र नारायणराव तात्या. तात्यांचा जन्म सन १७२३।२४ सालीं झालेला आहे. ही वेणूताई पुढें पेशवाईतले प्रसिद्ध सरदार त्रिंबकराव मामा पेठे यांस दिली.
  सन १७२८ सालीं पिराजी घोरपडे मौजे हलकर्णी कर्यातनूल हें ठाणें काबीज करण्याकरितां गेले होते तेथें लढाईत ठार झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र राणोजी घोरपडे हे सेनापतींच्या दौलतीचे मालक


(पान ३४ वरून समाप्त.)

लोकांचे हिस्से होतेच. आजरें महालाची सबंध अमुक खेडीं अमक्याकडे व अमुक अमक्याकडे अशी वांटणी ब्रिटिश सरकारानें मात्र केलेली आहे. त्यापूर्वी ती कधीही झालेली नाहीं.