पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(३४)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास

नारायण 'ममलकत मदार' यांच्या नांवें निराळा सरंजामजाबता करून दिला.+ मागें सन १७०३ च्या सरंजामजाबत्यांत व्यंकटरावांनीं


+ या सरंजामजाबत्यांत मोकासे व इनाम गांव दिले आहेत त्यांपैकी बरेच व्यंकटरावांच्या हाती कधी आले नाहींत व कांहीं आले होते ते सर्वच पुढें त्यांच्या घराण्याकडे चालले असें नाहीं. मोकाशास महाल लावून दिले आहेत ते सर्व महाल अर्धे अर्धे असून त्यांतच आजरें महाल दिला आहे त्याचें वर्णन ‘ .||. तपें आजरें’असे दिलें आहे. त्याचा अर्थ फक्त दुतर्फी खेड्यांच्या उत्पन्नाचा हिस्सा एवढाच आहे. एकतर्फी खेडीं त्यांजकडे सेनापतींकडून चालत होतीच. त्यांत हा दुतर्फी खेड्यांचा मोकासा त्यांस नवीन मिळाला, त्यामुळें सबंध आजरें महालावर आतां त्यांचा अंमल बसला. ही गोष्ट नीट समजण्याकरितां येथे थोडा अधिक खुलासा केला पाहिजे. आजरें महालाची खेडी ९७ असून शिवाय त्यांत भूधरगड, सामनगड व मनोहरगड असे तीन किल्ले आहेत. आजरें येथेही लहानसा किल्ला होता त्यांत महालाचें दास्तान असून महलाच्या व आजरें किल्ल्याच्या रक्षणार्थं शिबंदी होती तो तेथेंच रहात असे. आणि महालकरी, फडनवीस वगैरे दरकदारही तेथेंच रहात. या सर्वांचा खर्च व भूधरगड वगैरे तीन किल्ल्यांचा खर्च महालाच्या उत्पन्नांतूनच भागवावयाचा असे. किल्ले व महाल एकाच्याच हातीं ठेवले तर तो प्रबळ होऊन बंड करील या भयान किल्ल्यांचे अंमलदार निराळे व महालाचा अंमलदार निराळा असावा असा निर्बंध होता. किल्लेकऱ्यानीं किल्ल्यापुरता बंदोबस्त ठेवावा. महालाशी त्याचा कांही संबंध नसावा. उलट पक्षी ज्याच्या ताब्यांत महाल असेल त्याने किल्ल्यांची बेगमी मात्र करावी, परंतु किल्ल्यांवर त्याचा काडीमात्र ताबा असू नये, अशी वहिवाट होती. वर ९७ खेडीं सांगितली त्यांत सुमारें एक तृतीयांश खेडी एकतर्फी होतीं, म्हणजे त्याचा सर्व महसूल महालाच्या खर्चाकडे नेमिलेला होता. बाकीच्या खेड्यांचे उत्पन्न महालकऱ्याने गोळा करून त्यांतलें निम्में महालाच्या खर्चास लावावें व निम्मे सामानगड वगैरे किल्ल्यांच्या अधिकाऱ्यांस द्यावें असा निर्बंध होता. अशा खेड्यांस दुतर्फी म्हणत. १७२० च्या सुमारास तयार झालेला आजरें महालाचा देहझाडा आम्ही पाहिलेला आहे त्यांत ३७ नि|| सेनापति, ९ नि|| इनामदार, १३ नि।। मनोहगड, ८ नि।। भूधरगड, व ३० नि॥ सामानगड असा ९७ खेड्यांचा तपशील आहे. म्हणजे ३७ एकतर्फी, ९ इनामदारांची व ५१ दुतर्फी खेडी गडनिसबतचीं त्या वेळीं होती. एकतर्फी खेड्यांतसुद्धां तनखेदार वगैरे

(पान ३५ पहा.)