पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(३३)
व्यंकटराव नारायण.

व व्यंकटरावांचें नीट बनत नव्हतें. अशी स्थिति झाल्यामुळें व्यंकटराव व त्यांचे कारभार यांची नजर शाहूमहाराजांचा आश्रय संपादण्याकडे लागली यांत नवल नाहीं. पेशव्यांच्या द्वारें तिकडे त्यांचा वशिलाही चांगला होता. व्यंकटरावांच्या अडचणी लक्षांत घेऊनच पेशव्यांनीं या वेळेपासून त्यांची सोय, उत्पन्न व अधिकार वाढविण्याचा हळू हळू उपक्रम सुरू केला. मिरज प्रांताच्या देशमुखी सरदेशमुखीची सनद कापशीकरांस मिळाली हें पेशव्यांच्या खटपटीचेंच फळ होय.व्यंकटरावांवर कृपा करण्याविषयीं शाहूमहाराजांच्या मनांत आलें तें केवळ पेशव्यांच्या भिडेमुळेच आलें असें मात्र नाही. शककर्तेमहाराजांच्या कारकीर्दीपासून ज्या ज्या लोकांनीं श्रमसाहस करून मराठी राज्याचा बचाव केला त्या त्या लोकांविषयीं महाराजांच्या मनांत आदर व प्रेम वसत होतें. नारो महादेव हे अशाच लोकांपैकी एंक असल्यामुळें व ते नुकतेच वारले असल्यामुळें त्यांचे पुत्र व्यंकटराव यांच्या योगक्षेमाची तजवीज करण्याविषयीं शाहूमहाराजांची उत्सुकता साहजिकच होती.
  या उत्सुकतेस व पेशव्यांच्या विनंतीस अनुसरून शाहूमहाराजांनीं व्यंकटरावास सन १७२२ त शिराढोण हा गांव इनाम दिला. पुढच्या वर्षी नादणी हा गांव इनाम दिल्याची सनद देऊन शिवाय मनेराजुरी, नादणी, आरग व म्हापण हे चार गांव इनाम दिल्याची निराळी स्वतंत्र सनद दिली. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे सन१७२४त उत्तूर हा गांव इनाम दिला. शाहूमहाराजांनीं व्यंकटरावांवर हा जो देणग्यांचा वर्षाव केला तो तेथेंच संपला असें नाहीं. या सालीं त्या महाराजांनीं अधिक उपयोगाची व इचलकरंजीसंस्थानाच्या इतिहासात फारच महत्वाची अशी देणगी दिली. ती अशी कीं, त्यानीं आर्बां अशरीन मय्या व अल्लफ, चैत्र शु. ५ सौम्यवासर, या दिवशीं व्यंकटराव