पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८७ )
नारायणराव गोविंद.

 संस्थानचा कारभार व सार्वजनिक बाबी यांत बाबासाहेबांचे मन किती गढून गेलें असलें पाहिजे हें वर आलेल्या विवेचनावरून दिसून येईल. इतक्या व्यापाचे मानसिक श्रम ज्याला करावे लागतात त्याला आरोग्याची अनुकूलता पाहिजे. परंतु बाबासाहेबांस ती अनुकूलता चांगलीशी नाहीं ही खेदाची गोष्ट आहे. पूर्वीं ते चांगले धटटेकटटे होते,परंतु अलीकडे १५ वर्षे त्यांस नेहमीं कांहिना कांही तरी होत असतें. विलायतेची सफर करून आल्यानें प्रकृतीची सुधारणा चांगली होईल असा डॉक्तर लोकांनीं अभिप्राय दिल्यावरून बाबासाहेब यंदां म्हणजे सन १९१३ सालीं विलायतेस सहकुटुंब गेले आहेत.
 आयुष्यांत उत्तम आरोग्य व संतान हे लाभ सर्वांहून श्रेष्ठ आहेत. हे चिरायित झालेले लाभ बाबासाहेबांस लौकर प्राप्त होवोत, अशी इच्छा प्रदर्शित करून आम्ही वाचकांचा निरोप घेतों.