पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१८७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १७७ )
व्यंकटराव केशव.

होऊं लागली. जुने मार्ग मुजून गेल्यामुळें व नवे मार्ग अपरिचित असल्यामुळें जहागीरदारांची दिशाभूल होऊन ते किंकर्तव्यताशून्य झाले. अशा स्थितींत मुनशी, शिरस्तेदार,अकबरनबीस, वकील वगैरे मध्यस्थांची चांगलीच पोळी पिकली ! डोक्यावरची जोखीम व जबाबदारी नाहींशी झाली, कांहीं काम नाहींसें झालें, आणि चोहोंकडे स्वस्थता झाल्यामुळें जहागिरींचा व संस्थानांचा वसूल अनायासानें व बरा येऊं लागला, मग काय विचारावें ! बहुतेक जहागीरदार व संस्थानिक आळशी, दुर्व्यसनी व चैनी झाले व या योगानें त्यांच्या आयुष्यांचा आणि बुद्धीचा अपव्यय झाला ! कांही थोडे मात्र या नवीन स्थित्यंतरांतही आळसास व चैनीस बळी न पडतां हुशारीनें वागून आपापल्या दौलतीचा बंदोबस्त राखणारे निघाले. अशा त्या थोडया लोकांत व्यंकटराव नारायण व केशवराव नारायण यांची गणना आहे व हें त्यांस भूषणावह आहे.


प्रकरण आठवें.
व्यंकटराव केशव व गोविंदराव केशव.

 तात्यासाहेब वारले तेव्हां त्यांच्या मातोश्री गंगाबाई व स्त्री यशोदाबाई या हयात होत्या. दत्तक पुत्र घेण्याबद्दल या बायानीं मंजुरी मागितल्यावरून सरकारानें पूर्वी कबूल केल्याप्रमाणें ती तत्काळ दिली. व त्याप्रमाणें भाऊबंद मंडळींत कोणाचा मुलगा पसंत करण्याजोगा आहे याविषयीं चोकशी सुरू झाली. तींत नारो महादेव यांचे चुलते नारो विश्वनाथ यांच्या वंशांतील विसाजी गंगाधर ऊर्फ आपा

२३