पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१८५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १७५ )
केशवराव नारायण.

वून द्यावी,आपण काशीस जाऊन राहणार,सरकारानें आपल्या संस्थानाचें वाटेल तें करावें, याप्रमाणें सरकारास लिहून कळविण्यापर्यंत त्यांच्या वैतागाची मजल गेली होती ! बुवासाहेबमहाराज काशीयात्रेस जातों म्हणत होते, चिंतामणराव सांगलीकर सुद्धां तेंच म्हणत होते, परंतु दोघांसही काशीस जाऊं न देतां सरकारानें आपल्या हुकुमाप्रमाणें त्यांस वागवावयास लाविलें. हल्लीं तात्यासाहेबांची ही तींच अवस्था झाली ! सरकारच्या पोलिटिकल खात्याचे त्या वेळचे अधिकारी होते ते भले गृहस्थ असल्यामुळें त्यानीं तात्यासाहेबांच्या मनाची स्थिति ओळखून त्यांशीं सौजन्याने वर्तन केलें, व नानाप्रकारें त्यांची समजूत केली कीं, “कोल्हापूरकर महाराजांची ताबेदारी नुसती नांवाची मात्र आहे ही सरकारच्या इच्छेप्रमाणे तुम्हीं कबूल केलीच पाहिजे. या योगानें महाराजांचा व तुमचा प्रत्यक्ष संबंध कांहीं येत नाहीं व तुमचा दर्जाही कांहीं कमी होत नाही. तुमच्या निकालावर अपील घेणें तें पूर्वीप्रमाणें सरकारी अंमलदार कोल्हापूर संस्थानच्या देखरेखीवर असतील तेच घेतील. महाराजांकडून तुम्हास कोणतीही तोशीस न लागावी याबद्दल इंग्रजसरकार खबरदारी घेईल." त्यावेळीं संस्थानिकांस दत्तक घेण्याची मंजुरी मिळणें ही सरकारची मोठी कृपा समजली जात असे. तात्यासाहेब म्हणाले कीं, मला पुत्र नाहीं. पुढेंमागें दत्तक घेण्याचा प्रसंग आला तर सरकारांतून परवानगी मिळाली पाहिजे. यावर सरकारांतून तत्काळ आश्वासन मिळाले कीं, इचलकरंजीकर यांस कारणपरत्वें दत्तकाविषयीं तजवीज करणें झाल्यास त्याचा विचार सरकार करितील;आणि हुकूम देणें तो कोल्हापूर इलाख्याची-तशीच -दक्षिण महाराष्ट्रदेशाची–अशा प्रकरणीं वहिवाट असेल तीस अनुसरून सरकारास वाजवी तें कर्तव्य होईल." याप्रमाणें आश्वासन मिळाल्यावर सरकारच्या इच्छेप्रमाणें तात्यासाहे