Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१६३)
दुसरे नारायणराव व्यंकटेश.

असें महाराजांनीं कबूल केलें आहे. त्यांचे देशमुखीचें वतन महाराजांनी जप्त करून तीन वर्षांंचा पैका अडकवून ठेविला होता, परंतु हल्लीं सरकारच्या हुकमावरून तो ऐवज पन्हाळी १७१३६ रुपये महाराजांनी इचलकरंजीकरांस तत्काळ दिले, व गांव घेतले होते त्यांपैकी एक गांव सोडून दिला, व बाकीचें गांव लौकरच सोडतों असें कबूल केले. इचलकरंजीकरांप्रमाणेच कागलकर व इतर जहागीरदार यांच्या नुकसानाचा फडशा महाराजांनी करून दिला व सरकारचा स्वारीखर्चही भरून दिला. इतकेंच झाल्यावर बेबरसाहेब फौज घेऊन धारवाडाकडे परत गेले.
 ता०३ जानेवारी स० १८२७ रोजीं नारायणराव बाबासाहेब वारलें. त्यावेळी त्यांचे वय सुमारे पन्नास वर्षाचे असावें.त्यांच्या स्त्रीचें नांव गंगाबाई. बाबासाहेबांस दोन पुत्र व पांच कन्या अशी सात अपत्ये होतीं.पुत्रांचीं नांवें अनुक्रमें व्यंकटराव व केशवराव अशी असून मुलींचीं नांवें अनुक्रमें १ कृष्णाबाई २ मनाबाई,३ सुंदराबाई, ४ यमुनाबाई, ५ वारणाबई अशीं होतीं. पटवर्धनांचा व इचलकरंजीकरांचा सख्यसंबंध सुरू होऊन शंभरांवर वर्षे लोटली होतीं. तथापि आजपर्यंत कधीं उभय कुलांच्या सोयरिकी झाल्या नव्हत्या. बाबासाहेबांनीं हा प्रघात नवीनच पाडिला व आपल्या पांचही मुली पटवर्धनांकडे दिल्या आणि चिंतामणराव पटवर्धन सांगलीकर यांची मुलगी आपल्या थोरल्या मुलास केली. बाबासाहेबांच्या मुलींपैकी कृष्णाबाई नीलकंठराव शिवराव वाडकर यास, मनूबाई कृष्णराव गोविंद सोनीकर यांस, सुंदराबाई रघुनाथराव केशव कुरुंदवाडकर यास, यमुनाबाई मिरजेस किल्लयांतले मोरेश्वरराव बल्लाळ यांस, व पांचवी वारणाबाई ही लक्ष्मणराव माधव पटवर्धन मळेकर यांस दिली होती. ती वारणाबाई गिरिजाबाई या नांवाने प्रसिद्ध असून