पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१६२)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

यांमध्यें वारंवार कटकट उत्पन्न होऊं लागली व आपआपल्या हिस्स्याच्या उत्पन्नापुरतीं खेडीं पृथक् वांटून घ्यावीं असें दोघांसही वाटूं लागलें. तेंव्हां स.१८२५ सालीं इंग्रजसरकाराने दोघांच्या उत्पन्नाचे हिशोब वाजवी रीतीनें पाहून खेडयांची वांटणी करून दिली. यामुळें त्या परगण्यांत पूर्वीपासून उभयपक्षीं लढे उत्पन्न होण्याचें कारण जागृत राहिले होतें तें यापुढें नष्ट झालें. या वांटणींत ७५ खेडीं इचलकरंजीकरांकडे व २२ करवीरकरांकडे रहावीं असें ठरलें.
 इचलकरंजीकरांची कित्येक खेडीं पूर्वी महाराजांनी घेतली होतीं तीं अद्यापि परत दिली नव्हतीं, व दरसाल फक्त साडेबाराशें रुपये घेऊन चालवावें असा करार झाला असूनही देशमुखीचे वतन महाराजांनीं तें वतन अन्यायानें जप्त केलेंं होतें. कागलकर घाटगे यांसही महाराजांनीं अतिशय उपद्रव दिला होता, व कागलचे ठाणें घेऊन जाळून टाकिलें होते. इंग्रजसरकाराने महाराजांस वारंवार निक्षून सांगितलें असतांही ते त्यांस जुमानीनात, तेव्हां सरकाराने निरुपाय होऊन महाराजांच्या पारिपत्याकारितां स० १७२५ च्या अखेरीस सहा हजार फौज रवाना केली. महाराजांनींही शहराबाहेर डेरे देऊन वीस हजार लोक गोळा केले होते.प्रथम लढाई करण्याचा त्यांचा राेंख स्पष्ट दिसत होता, परंतु सरकारची फौज समीप आली तेव्हां त्यांचे अवसान खचलें व त्यांनी इंग्रजी फौजेच्या स्वागताकरितां सलामीच्या तोफा केल्या ! इंग्रजी फौजेवर धारवाडचे सरकलेक्टर बेबरसाहेब हे मुख्य अधिकारी होते. महाराजांनी त्यांशीं बहुत मिनतवारीनें तह करण्याविषयीं बोलणें लाविल्यावरून त्या साहेबानीं ता.३० डिसेंबर स० १८२५ रोजी तह ठरविला. या तहाच्या दुसऱ्या कलमांत नारायणरावबाबा घोरपडे इचलकरंजीकर यांचें देशमुखीचें वतन, हक्क व इनाम खेडीं वगैरे आपण पूर्वीप्रमाणें यथास्थित चालवूं