बाबासाहेबांस सामर्थ्य नव्हतेंसें नाहीं. पण लढाई करावी तर इंग्रजसरकार नाराज होईल हें समजून त्यांनीं धारवाडास पोलिटिकल एजंट यांस व पुण्याच्या कमिशनरसाहेबांस महाराजांचा उपद्रव बंद करण्याविषयीं पत्रें लिहिली. तिकडून महाराजांस याविषयीं इशारा झाला,पण त्यांनीं तो मनावरच घेतला नाहीं! उलट इचलकरंजी संस्थान घेण्याच्या उद्देशानें फौजेची आणखी तयारी चालविली! या समयीं ता.१ ऑक्टोबर स०१८२२ रोजीं चापलीनसाहेबांनीं महाराजांस रागे भरून पत्र लिहिलें यांत म्हटले आहे कीं, "इचलकरंजीकर घोरपडे हे श्रीमंत पेशवे यांचे आप्त. बहुत दिवसांपासून (पेशवे सरकार) त्यांचे बहुमान फार राखीत होते. हल्ली आमचें सरकार त्या जागीं आहे. म्हणोन त्या सरदारांवर अन्याय होत असतां पाहोन उगेच राहोन अगदीं सोडून देणें सरकारास योग्य दिसत नाही. ऐशियास कलमी करण्यांत येत आहे कीं, आमहाराजांनी त्यांजवर आपले इलाखा वाजवी असेल तितका मजकूर करून घ्यावे.परंतु जाजती करून त्यांचे दौलतीस खलष करावें,अथवा त्यांचे वाजवी हक्क नेत (?) मोडावा, असें आमहाराजांकडून होऊं नये." देशमुखीपुरते तरी इचलकरंजीकर हे महाराजांचे ताबेदार आहेत ही गोष्ट चापलीनसाहेबांनीं या पत्रांत गृहीत केली आहे; पण असें मानणें पेशवाईच्या शिरस्त्यास सोडून आहे. पेशवेसरकारच्या स्थानीं आमचे सरकार आहे असे इंग्रजसरकार प्रतिपादन करीत असतां व त्याप्रमाणें वागत असतां त्यानें इचलकरंजीप्रकरणीं मात्र स्थानिवद्भावाचा त्याग केला असेंच म्हटलें आहिजें! आजरें परगण्यांत एकतर्फी व दुतर्फी खेडीं होतीं त्यांत दुतर्फा खेड्यांच्या उत्पन्नाचा निम्मा हिस्सा करवीरकर महाराजांचा होता हें पूर्वी सांगितलेंच आहे. या उत्पन्नाबद्दल महराज व इचलकरंजीकर२१
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१७१
Appearance