पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१६८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१५८)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

मुधोळकर वगैरे सरदार आहेत त्यांनी आमच्या सरकाराशीं नवीन तह ठरवून घेतले आहेत त्याप्रमाणें तुम्हींही तह ठरवून घ्यावा. त्यावर बाबासाहेबानीं उत्तर दिलें कीं, इचलकरंजी संस्थान पेशवे सरकारांतून आमच्या हवालीं झालें तेव्हां दोन लक्ष रुपये नजराणा आम्हांपासून त्या सरकारनें घेतला आहे. जेवढया मुलखावर त्या नजराण्याचीं रक्कम त्या सरकारानें आकारिली तितका सर्व मुलूख आम्हाकडे चाल विण्याविषयीं तें सरकार व त्याचे जागीं हल्ली आलेलें इंग्रजसरकार बांधलें गेलें आहे. बाजीरावसाहेबानीं आमचे तैनातीचे गांव पंधरा हजार रुपये उत्पन्नाचे होतें ते काढून घेतले आहेत व मिरज प्रांताच्या देशमुखीचें वतन जप्त केले आहे. तसेच प्रांत पन्हाळ येथील देशमुखीचें वतन करवीरकरमहराजानीं जप्त केलें आहे; व आमचे संस्थानांपैकी कित्येक गांव जबरीनें घेतले आहेत, व इतर पुष्कळ प्रकारांनीं नासधूस केली आहे, त्याबद्दलच गिल्ला आम्ही चापलीनसाहेबांकडे यापूर्वी केलाच आहे. सरकारनें मेहेरबानगी करून बाजीरावसाहेबानीं जप्त केलेले वतन व गांव सोडून द्यावे व करवीरकरमहारजांनींं आपल्या राज्यांतले वतन जप्त केलें आहें व गांव घेतले आहेत तेही त्या महाराजांकडून सोडवून देववावे.म्हणजे तह ठरवून घेण्यास ठीक पडेल. तह होण्याआधीं प्रथम आमचीं ही सर्व कामें सरकारने करून द्यावी. हें बाबासाहेबांचे उतर एकून अल्पिष्टनसाहेबांनीं त्यांस आश्वासन दिलें कीं, तुमच्या म्हणण्याचा विचार करून सर्व बंदोबस्त करून देऊं.याप्रमाणें उत्तर प्रत्युत्तर होऊन तहाचा मजकूर रहित झाला तो पुढें कायमचाच रहित झाला ! इतर सरदारांप्रमाणें इंग्रंजसरकाराशीं इचलकरंजीकरांचा तह ठरला असता तर तो बाबासाहेबांच्या कारकीर्दीतच ठरला असता; व त्यास ती वेळही अगदीं योग्य होती. कारण कीं, इंग्रजसरकाराचें राज्य नुकतेंच सुरू