पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५७ )
दुसरे नारायणराव व्यंकटेश.

ठेविले. या आवाडावीबद्दल आजपर्यंतच्या पद्धतीप्रमाणें पाहिलें तर बाबासाहेबानीं करवीरकरांच्या खेडयांवर स्वारी करून उसनें फेडावयाचें, परंतु करवीरकरांशी खटला वाढवावा तर इंग्रजसरकार नाखुष होईल हे समजून व तूर्तच्या मन्वंतरावर लक्ष देऊन,बाबासाहेबानीं पुण्यास चापलीनसाहेबांकडे फिर्याद दिली.
 येथें हें सांगितलें पाहिजे कीं, पेशवाईचें राज्य इंग्रजसरकारानें जिंकून घेतल्यावर त्याची व्यवस्था करण्याचें काम अल्पिष्टनसाहेबांवर सोपविलें होतें. हे साहेब फार हुशार व इकडच्या रीतीरिवाजांचे माहीतगार व अनुभवी म्हणून सरकारांत वाखाणले गेले होतें व त्या वाखाणणीस ते सर्वथा पात्र होते. बहुतेक मराठी सरदारांची व त्यांची ओळख होती व जुन्या खानदानीच्या घराण्याचा त्या ऱ्हासकाळांतही परामर्ष घेण्याचें काम त्यानीं उत्तम रीतीनें केले. त्यानीं चापलीन साहेबांस पुणें येथे कमिशनर नेमिलें होतें. या कमिशनरांच्या हाताखालीं धारवाडचे सरकलेक्टर होत त्यांजकडे कोल्हापूर व दक्षिण महाराष्ट्रांतील संस्थानें यांवर देखरेख ठेवण्याचें काम सोपविलेलें होतें.
 सन १८२० सालीं मराठे सरदारांच्या भेटी पुणें मुक्कामीं अल्पिष्टनसाहेबानीं घेतल्या त्या वेळीं नारायणराव बाबासाहेब तेथें हजर होते. अल्पिष्टनसाहेबानीं बाबासाहेबांस मेजवानी करून हत्ती, घोडे व जवाहीर दिलें, व त्यांचा मोठा बहुमान केला.बाबासाहेबानींही त्यांस आपल्या घरीं मेजवानीस बोलाविलें व त्यांचा यथायोग्य सन्मान केला.
 या भेटीनंतर अल्पिष्टनसाहेबानीं बाबासाहेबांजवळ बोलणें काढिलें कीं, पेशवाईचे व त्यापूर्वींचे पटवर्धन व अक्कलकोटकर व