Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१५४)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

स्वारी अगर कोणाशी लढई करूं नये. ४ पेशव्यांस चिकोडी व मनोळी हे तालुके द्यावे. ५ बाकीचीं गांवखेडीं व ठाणीं निपाणकरानें घेतली असतील तीं सर्व त्याजकडून इंग्रजसरकारानें महाराजांस परत देवावीं व पुढें करवीरराज्याच्या सुरक्षितपणाबद्दल त्या सरकारानें हमी घ्यावी. याप्रमाणें तहाचीं मुख्य कलमें होतीं.हा तह सन १८१२ या वर्षी झाला.
 तहाप्रमाणें करवीरकरानीं चिकोडी व मनोळी हें तालुके पेशव्यांस द्यावयाचे परंतु ते निपाणकरानें आगाऊच बळकाविले होतें.ते तालुके तो करवीरकरांसही देईना व पेशव्यांसही देईना ! याशिवाय त्यानें करवीरकरांचीं ठाणी व गांवें घेतली होती व इतर संस्थानिकांचींही पुष्कळ गांवें घेतलीं होतीं.त्यांत लाट,रांगोळी,अर्जुनी, मतिवडे,नांदणी,सुळकूड, शिपुर, टाकळी, शिर्दवाड प्रांत मिरज,हीं नऊ खेडीं इचलकरंजीकरांची असून तीं प्रथम निपाणकराने त्यांपासून जबरीने घेतलीं व मागून त्यांतलीं कांहीं खेडीं निपाणकरापासून करवीरकरानीं घेतली. ही सारी खेडीं आपली आपणास मिळावीं असे पेशवे व अल्पिष्टन् साहेब यांस इचलकरंजीकरांचे म्हणणे होते. पण आधीं निपणकराचा दंगा शांत झाल्याखेरीज कोणताच बंदोबस्त होण्याजोगा नव्हता, आणि तो तर पेशवे व इंग्रज या दोघांसही जुमानीना ! शेवटी त्यांस वठणीस आणण्याकरितां इंग्रजानीं सांवतवाडीकडून आजऱ्यांस पलटणें आणून उतरविलीं, त्या पलटणांपैकी सुमारें तीन हजार लोक संकेश्वरास आले,तेव्हां निपाणकर शुद्धीवर


 * या प्रसंगीं आजऱ्यांस इंग्रजी फौज आल्याचा मजकूर ग्रांटडफच्या ग्रंथामध्यें नाहीं व अर्थात् ग्रेहाम, व ग्याझेटियरकार व मोडक वगैरेंच्याही लिहिण्यांत नाहीं !