पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१५३ )
दुसरे नारायणराव व्यंकटेश.

परभारें बोलूं नये. बोललां तर तुमच्या संस्थानाचें नुकसान होईल ! यावर इचलकरंजीच्या वकिलानें उत्तर दिलें कीं, “ आम्हाकडे दोहींकडील अंमल आहे. आज तागायत ( पेशवे ) सरकारतर्फेनें बोलत गेलों. प्रस्तुत तुुमच्याच पेटयांत बोलावें तर विचार करून बोललें पाहिजे ! " सन १८०१ मध्यें करवीरकरानीं शिंद्यापासून याद ठरवून घेतली तींत तो मजकूर मोघम शब्दांनी दर्शविला होता तोच आत बारा वर्षांनी ब्रिटिश रेसिडंटासमोर स्पष्ट शब्दांनीं बोलून दाखविला आहे ! यांत त्यांच्या वकिलानै नांवांची भेसळही ख़ुबीनें केलेली आहे ! जिकडे चाकरी तिकडचा इलाखा म्हणजे ताबेदारी हा न्याय सर्वसंमत आहे. आणि या न्यायानें पाहिले तर सेनापति व नेरलीकर यांसंबंधे करवीरकरांचे म्हणणें यथार्थ आहे. शितोळ्यासंबंधें वादास्पद आहे, आणि इचलकरंजीकरांसंबंधें अगदींच निराधार आहे !
 गांवखेडीं ज्याचीं त्यास देण्यासंबंधाचा वर दर्शविलेला वाद निपाणीकराची बंडाळी व करवीरकरांनीं ब्रिटिशसरकाराशीं सन १८१२ सालीं ठरविलेला तह या दोन प्रकरणांतून निष्पन्न झाला होता.सन १८०८ पासून निपाणकर देसायानें करवीरच्या राज्यांत मोठी धामधूम करून व दोन लढायांत महाराजांचा पूर्ण पराजय करून त्यांस अगदीं जेरीस आणिलें होतें व चिकोडी, मनोळी हे दोन सबंध तालुके व दुसरीं अनेक ठाणीं घेऊन शेवटीं सन १८११ त खुद्द करवीरासच वेढा घातला होता. अशा स्थितींत शिवाजीमहाराजानीं आपल्या राज्याचा बचाव करण्याविषयी इंग्रजसरकाराशीं बोलणें लावून तह ठरवून घेतला. या तहांत १ इंग्रजांस मालवण द्यावे. २ लढाऊ आरमार ठेवूं नये. ३ इंग्रजसरकारच्या सल्ल्याखेरीज कोठें २०