Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४५ )
दुसरे नारायणराव व्यंकटेश

.

मैत्री होऊन कोल्हापूरकरांचा बंदोबस्त करण्याचें काम नानांच्या सल्ल्यावरून पेशव्यांनीं भाऊंकडे दिलें. सन १७९९ च्या पावसाळ्यांत भाऊंनीं कोल्हापूरच्या राज्यांत शिरून पुष्कळ ठाणीं घेतलीं.व ते कोल्हापुरावर चालून येऊं लागले, तेव्हां तेथील महाराजांनीं पट्टणकुडी येथें त्यांस गांठून त्यांचा पूर्ण पराजय केला व त्यांस जखमी करून कैद केलें. तेथेंच भाऊंचे देहावसान झालें. करवीरकरांनीं परशुरामभाऊंस क्रूरपणानें मारून टाकिलें असें जे म्हणणारे आहेत त्यांस "इचलकरंजी दप्तरा'पैकी निवडक लेख आम्हीं छापिलें आहेत त्यांतल्या नं० २३१ पासून नं० २३४ पर्यंतच्या चार पत्रांत आधार मिळण्याजोगा आहे. उलटपक्षीं जखमा लागल्यामुळे भाऊ मेलेले सांपडले, त्यांस कोणीं मारिलें नाही, असें प्रो० मोडकप्रभृति ग्रंथकार लिहितात त्याच्या खरेपणाबद्दल लेख आधार आमच्या पहाण्यांत नाही.
 कोल्हापूरच्या महाराजांस याप्रमाणेंं जय मिळाल्यावर आतां आपणास कोणाचें भय नाही, आपण म्हणूं तें करूं, असें मानून ते फौज व तोफखाना घेऊन इचलकरंजीवर चालून आले, व त्या ठाण्यास वेढा घालून बसले. आंत महादाजी विठ्ठल फडनवीस होते त्यांनी हिमतीनें ठाणें झुंजविल्यामुळें महाराजांनीं तें घेण्यासाठीं वारंवार निकरानें एलगार केला असतांही तो फुकट गेला. एक महिनाभर झटपटी होऊन शेवटीं महाराज समेटाचें बोलणें ऐकण्यास कबूल झाले. नंतर बाबामहाराज नरसीपूरकर यांचे विद्यमानें तह होऊन करवीरकरांनीं इचलकरंजीकरांचे गांव सोडावे व लूट परत द्यावी असें ठरलें. परंतु यांपैकी कांहीं एक अमलांत आलें नाहीं ! पुढे पररामभाऊंचे पुत्र रामचंद्रपंत आपा यांनीं पुण्याहून फौज व शिंद्यांचीं

१९