हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३५ )
दुसरे व्यंकटराव नारायण.
त्यानीं संस्थानचा कारभार आटोपिला. आपणास कैदेंत ठेविलें. आपला सर्वत्र दुर्लौकिक झाला. आतां जगून काय करावयाचें ? " असे विचार नेहमीं त्यांच्या मनांत घोळूं लागले. ता. २ जानेवारी सन १७९५ रोजीं पाय दुखतो असें निमित्त करून त्यावर घालण्यासाठीं म्हणून पालखीच्या एका भोयाकडून त्यांनीं रुईचा चीक आणविला व तो पिऊन प्रण दिला ! व्यंकटरावांच्या अंगांत चांगले गुण पुष्कळ होते. परंतु दुर्व्यसनामुळें त्या गुणांवर पाणी पडून त्यांचा शेवट अशा दुःखकारक रीतीनें झाला !