Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १२७ )
दुसरे व्यंकटराव नारायण.


शिंद्यांच्या मनांतून हे दोन गांव करवीरकरांस द्यावयाचे होते, परंतु पेशव्यांची आज्ञा व फडक्यांची रदबदली पाहून त्यानीं करवीरकरांचें म्हणणे मान्य केलें नाहीं.
 याप्रसंगी महादजी शिंद्यांशी करवीरकरानीं जो तह केला त्यांत एक कलम आहे तें असें:-

पेशवे.

" राजश्री रघुनाथराव मंत्री व मिरजकर (सर्व पटवर्धन) व शिराळेंकर भोसले व महिपतराव घोरपडे व थोरात वाळवेंकर व व्यंकटराव घोरपडे इचलकरंजीकर वगैरे आमचे सेवक व राजमंडळचे सेवक साताऱ्याकडील यांचा आकस धरून उपद्रव करूं नये व आपले राजमंडळापैकी मशारनिल्हेकडे इनामी वगैरे गांव व वतनें असतील ती पूर्ववतप्रमाणे चालवावीं. "

करवीरकर.

" मिरजकर व रघुनाथराव मंत्री व शिराळेंकर भोसले व महिपतराव घोरपडे व व्यंकटराव घोरपडे व थोरात वगैरे तुम्हाकडील व साताऱ्याकडील यांजला उपद्रव होणार नाही. त्यांजकडे इनाम वगैरे पूर्ववतप्रमाणें राजमंडळपैकी असेल तें चालवूं व आकसही होणार नाही."

 इंग्रजांनी स. १७७९ त पुण्यावर स्वारी केली. त्यांस मागे हटविण्याच्या मसलतींत शिंदे व फडके वगैरे सरदार गुंतले. सुरापूरकर बेरडांचा दंगा मोडण्यासाठीं परशुरामभाऊनीं तिकडे स्वारी केली. ती संधी साधून शिंद्यांशीं नुकताच केलेला तह मोडून करवीरकर पुनः धामधूम करूं लागले. त्यांच्याच चिथावणीवरून कित्तूरच्या देसायानें पुनः दंगा केला व चंदगडें या ठाण्यास वेढा घातला. असें झाल्यामुळें पेशव्यांनी कोल्हापूरकर व कित्तुरकर यांचें पारिपत्य करण्याच्या कामावर व्यंकटरावदादांस नेमिलें व त्यांच्या हाताखालीं