होती. परंतु हैदरअल्लीच्या चिथावणीवरून कित्तूरच्या देसायानें या वेळीं धारवाडप्रांती दंगा करून मुलूख बळकाविला होता, सबब याच्या पारिपत्यास जाण्याकरितां कोन्हेररावांस पेशवेसरकारचा तगादा लागला होता. यामुळें ही कलागत तूर्त इतक्यावरच संपून वर लिहिल्याप्रमाणें तह झाला.
कोन्हेरराव कित्तुराकडे गेल्यावर करवीरकरानीं पुन्हा उचल खाल्ली, तेव्हां तिचा यथाशक्ति प्रतिकार करणें इचलकरंजीकरांसही भाग पडलें. मग पुणें दरबारातून दोन्ही पक्षांस तंबी मिळाली कीं, तुम्ही आपापले कारकून पुरंदरास पाठवून सामोपचारानें तंट्याचा निकाल लावावा, तें न करितां झुंज भांडण नित्य उठून करितां हें ठीक नाही. याकरितां लढाई बंद करून इकडे कारकून पाठवावे व आम्ही यादी ठरवून देऊं त्याप्रमाणे उभयतांनीं वागावें. त्या प्रसंगी करवीरकरानीं नाना फडणीस यांस कागदोपत्री मात्र आश्वसन दिलें कीं, ' व्यंकटराव यांची गांव खेडी वतनबाब यांवरची आम्ही जप्ती उठवून सर्व त्यांचे त्यांच्या हवाली केलें आहे. त्यानीं आमच्या मुलुखास उपद्रव दिला नाहीं तर त्यांस इकडूनही उपद्रव होणार नाहीं. ' परंतु याप्रमाणें तें एकीकडे आश्वासन देत होते आणि एकीकडे पेशव्यांचा मुलूख लुटीतही होते ! इचलकरंजीकरानी तहाच्या शर्तीप्रमाणें फौज दूर केली, परंतु करवीरकरांनी केली नाही. चिकोडी व मनोळी हे दोन तालुके करवीरकरमहाराजांस पेशव्यानीं परत देऊं केले होते, परंतु याच तालुक्यांवर रामचंद्रनाईक परांजपे यांजपासून करवीरकरांनी कर्ज काढिलें होतें तें कर्ज फिटेपर्यंत तालुके सावकाराच्या ताब्यात रहावयाचे होते. परंतु करवीरकरांनी हल्लीं तेथें जबरदस्तीनें अंमल बसविला. त्यांस हुसकून लावण्याकरितां रामचंद्र गणेश व भवानराव प्रतिनीधि यांची पेशव्यानीं रवानगी केली व त्यांस फौजेसह मिळण्याविषयीं
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१३१
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १२१ )
दुसरे व्यंकटराव नारायण.