पहिलें सातारकर छत्रपतींचें संस्थान पूर्णपणें त्यांच्या ताब्यांत होतें. पण दुसऱ्या म्हणजे करवीर संस्थानाचा प्रकार निराळा होता. तें संस्थान कोणासही खंडणी देण्यास पात्र नसून हल्लीं स्वतःपुरतें स्वतंत्र व पृथक् झालें होतें. इतकें असून पुन्हां शिवशाहीमध्यें त्याचा अंतर्भाव होतच होता! त्या खालचा दर्जा नागपूरकर व अक्कलकोटकर भोंसले, गायकवाड, प्रतिनिधि, सचिव, आंग्रे व वाडकर सावंत इत्यादि संस्थानिकांचा असून ते पेशव्यांच्या बरोबरीचे होते. त्यानीं जेथपर्यंत राज्यांत कांहीं फंदफितूर केला नाहीं तेथपर्यंत त्यांच्या संस्थानांत ढवळाढवळ करण्याचा पेशव्यांस अधिकार नव्हता, हे सर्व सालिना जुजबी खंडणी देण्यास पात्र होते. यांपैकी कांहीजणांस कधीं काळीं तर कांहींस दर वर्षी लष्करी चाकरी करावी लागे. आंग्रे, सचिव व सावंत यांस लष्करी चाकरीचे कलम लागू नव्हतें. आसपास कोठें काम पडलें तर तितक्यापुरती त्यांनीं जुजबी फौजेनिशीं मदत करावयाची असे. तसेच पाटणकर, घोरपडे वगैरे हुजरातीचे मानकरी होते तेही सर्व मानानें पेशव्यांच्या बरोबरीचेच होते. त्यांनींही जेथपर्यंत फंदफितूर केला नाहीं तेथपर्यंत त्यांच्या वाटेस जाण्याचा पेशव्यांस अधिकार नव्हता. या मानकऱ्यात मातबर होते त्यांच्या सरंजामास लहान मोठे तालुके होते. पण गरीब-पांच दहा स्वरांचे धनी-होते त्यांच्या सरंजामास एखादें खेडेच लावून दिलेलें होंतें ! हे सर्व मानकरी फक्त लष्करी नोकरी करणारे होतें. त्या खालचा दर्जा पेशव्यांनी ज्यांच्या सरदाऱ्या उत्पन्न केल्या होत्या त्यांचा. ते शिंदे, होळकर, रास्ते, पटवर्धन, विंचूरकर वगैरे असंख्य होते. त्यांवर मात्र नारायणरावसाहेबांच्या खुनापर्यंत पेशव्यांची सत्ता अबाधित चालत होती. सर्व दर्जाचे लोक वर सांगितले आहेत, त्या सर्वांचा सांभाळ होऊन त्यांचें ऊर्जित व्हावें , त्यांचे परस्परांत कलह होऊन रयतेची
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१०५
Appearance