Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ९० )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

बाईचें या वेळीं काम झालें ! त्या सालीं पानपतचें युद्ध झाल्यामुळें तूर्त तरी करवीर राज्याची जप्ती होणें टळलें!

 त्या सालच्या एप्रिल महिन्यांत अनूबाई पुण्यास गेल्या तों रघुनाथराव दादासाहेब व नारायणरावतात्याही स्वारी करून परत आले. त्या प्रसंगी दादासाहेबानीं अनूबाईस सांगितले कीं, राणी कुसाबाई गरोदर आहेत असें राणी जिजाबाई म्हणतात हें खरें कीं खोंटें, हें पाहण्याकरितां तुम्ही करवीरास जाऊन बाळंतपणाच्या वेळी तेथे समक्ष हजर असावें. हें बोलणें अनूबाईंनीं मान्य केलें होतें. पण नानासाहेब हिंदुस्थानांतून परत येत होते त्यांचीं त्यांस पत्रें आलीं कीं, तुम्ही आमच्या भेटीकरितां टोंक्यांस यावें. त्यामुळें करवीरास येण्याचा बेत रहित करून त्या टोंक्यांस गेल्या. कुसाबाई बाळंत होऊन पुत्र झाल्याची खोटीच खबर मे महिन्यांत जिजाबाईनी पेशवे व अनूबाई यांस लिहून कळविली, परंतु ती त्या दोघांसही खरी वाटली नाही.

 पुढें त्या सालच्या जून महिन्यांत नानासाहेब पेशवे मृत्यु पावले. त्यांचे पुत्र माधवराव यांस पेशवाईचीं वस्त्रे मिळालीं. तीं वर्तमानें कळतांच निजामअल्ली प्रचंड सेना जमा करून पुण्यावर चालून आला. या मोहिमेंत त्याची सरशी झाली असती तर जिजाबाईंस बहुत फायदा झाला असता. निजामअल्लींशीं तह करण्याचा रघुनाथराव दादासाहेब व सखारामबापू यानीं यत्न केला, परंतु सारेंच राज्य घेण्याचा त्याचा रोंख दिसल्यावरून त्याशीं लढाई करावी म्हणून दादासाहेबानींही चोंहोकडून सैन्य जमा केलें. या मोहिमेंत खुद्द नारायणरावतात्या हजर नव्हते, परंतु त्यांचा सरदार विसाजी नारायण एक हजार स्वारांसह दादासाहेबांचे फौजेस मिळाला होता. त्यानें या मोहिमेंत झालेल्या अनेक झटापटींत उत्तम रीतीनें कामगिरी बजावली. निजामअल्लीशीं