Jump to content

पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एचआयव्हीचा विषाणु आहे हे कळत नाही. शरीरयष्टीकडे बघून जोडीदार एचआयव्हीबाधित आहे का नाही हे कळू शकत नाही. हळूहळू एचआयव्ही प्रमाण जस जसं शरीरात वाढायला लागतं तस तसं एचआयव्ही शरीराची रोगप्रतिकारशक्ती नष्ट करतो. सी. डी. 4 ( रोग प्रतिकार करणाऱ्या पेशींचा एक प्रकार) पेशी नष्ट व्हायला लागतात आणि मग एक स्थिती अशी येते की शरीर कोणत्याच रोगाचा प्रतिकार करू शकत नाही. अशा वेळी कुठलाही आजार त्या व्यक्तीला होऊन त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. या शेवटच्या अवस्थेला एड्स म्हणतात. एचआयव्हीची लागण झाल्यापासू ते एड्सच्या टप्प्यापर्यंत पोहोचायचा सरासरी सात ने नऊ वर्षांचा कालावधी असतो. [65] एचआयव्हीची लागण झाल्यापासून ती व्यक्ती ज्या कोणाबरोबर ( स्त्री वा पुरुष ) असुरक्षित संभोग (गुदमैथुन / मुखमैथुन / योनीमैथुन) करते त्यांना एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता असते. एचआयव्हीची लागण झाली आहे की नाही हे फक्त रक्ताच्या चाचणीवरून कळू शकतं. ती चाचणी करण्याअगोदर गवाक्ष काळाचा (विंडो पीरिअड) चा विचार करणं गरजेचं असतं. असुरक्षित संभोग झाल्यास त्याच्या नंतर तीन महिन्यांनी (गवाक्ष काळ तीन महिन्याचा आहे) एचआयव्हीची रक्ताची चाचणी करून घ्यावी. तीन महिने पूर्ण होण्याच्या आत एचआयव्हीची चाचणी केली तर रिपोर्ट बरोबर येईल याची खात्री देता येत नाही. जर सरकारी एचआयव्ही काउन्सेलिंग व चाचणी केंद्रात गेलात तर एचआयव्ही काउन्सेलर्स कडून या विषयाची सगळी आवश्यक माहिती मिळू शकते. जर चाचणीसाठी परस्पर वैद्यकीय प्रयोगशाळेत गेलात तर ते ही माहिती पुरवत नाहीत. पूर्वी एचआयव्हीवर औषधं नव्हती. आता एचआयव्हीचा विषाणु काबूत ठेवणारी एआरटी औषधं उपलब्ध आहेत. ही औषधं एचआयव्हीचा विषाणु पूर्णपणे नष्ट करू शकत नाहीत. पण एचआयव्हीच्या वाढीचा वेग खूप प्रमाणात कमी करतात. जेव्हा एचआयव्हीबाधित व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी होते त्यावेळी एआरटी औषधं सुरू करून ती आयुष्यभर नियमित घेण्यानी एचआयव्हीबाधित व्यक्ती दीर्घ काळ जगू शकते. एचआयव्हीबाधित व्यक्तींबद्दल अजूनही समाजात गैरसमज आहेत, भीती आहे. एचआयव्हीबद्दल माहिती देण्याच्या नावाखाली अर्धवट माहिती देणं; लोकांच्या मनात भीती निर्माण करणं; नीतिमत्ता शिकवणं घडत आलं आहे. याच्यातून एचआयव्हीबाधित लोकांबद्दल भीती निर्माण झाली आहे. पूर्वी हाडं, कवट्या दाखवून लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करण्यात येत होती. आता हाडं, कवट्या दिसत नसल्या तरी या विषयाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललेला नाही. इंद्रधनु... १०५