पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमच्या चालीरीतींविषयीं व त्यांच्या प्राचीन उगमाविषयींचें अज्ञान सुशि- क्षित समाजांत अप्रतिहत रीतीनें वावरूं लागले आहे. अज्ञानसुद्धां पुरवतें पण विपरीत ज्ञान त्याचे जाग संचार करीत आहे ही त्याहूनही अधिक दुःखाची गोष्ट आहे. आमच्या पूर्वीच्या अस्सल आर्य चाली कोणत्या, त्या पडण्याचा हेतु काय होता, त्यांत मागाहून परकीय चालींची कशी भेसळ झाली व आज त्या मूळच्या चालीचें कसें विकृत स्वरूप दिसत आहे, वगैरे गोष्टींचा विचार करणारे सुद्धां थोडे, मग त्यांतल्या ग्राह्याग्रात्यांशाविषयींची चर्चा व व्यावहारिक अंगीकार करणारे फारच थोडे दिसले, आणि आपल्या चाली- रीतींविषयीं अज्ञानानें निष्कारण तिरस्कार व परकीयांच्या चालींचें निष्कारण अनुकरण करण्याविषयींचो अज्ञानमूलंक प्रवृत्ति हों दिसून आलीं तर त्यांत नवल काय? पण कोणत्याही समाजांत अशी स्थिति दिसून येणें हें त्याच्या अधोगतीच्या अनेक लक्षणांपैकीं एक लक्षण आहे, अशी माझी पक्की समजूत आहे. समाजाची सुधारणा म्हणजे अगदीं कोऱ्या करकरीत पाटीवर अक्षरें काढणें नव्हे; किंवा बिनपायावरची इमारत नव्हे. अशी इमारत बांधतां येणेंच अगोदर शक्य नाहीं, मग तिच्या गगनचुंबी उच्चत्वाकडे पाहून मनांत समा- धान मानण्याचें भाग्य प्राप्त होण्याची गोष्ट कशाला पाहिजे? असे प. वा. न्यायमूर्ति रानड्यांसारख्याचें सुद्धां मत होतें; व तें सर्वथा सत्यमूलक आहे असे विचाराअंती प्रत्येकास कबूल करावें लागेल. असे जर आहे, व आमच्या सामाजिक सुधारणेची इमारत सशास्त्र व पद्धतशीर रीतीनें उठविण्याची जर आमची खरी खरी अंतःकरणपूर्वक इच्छा आहे, तर आमच्या समाजाच्या पूर्वपरंपरेविषयींचे अज्ञानांत राहून कसे चालेल? आमच्या समाजाच्या पूर्वेति- हासाविषयीं अज्ञानमूलक अभिमान जसा गर्ह्य आहे, तसा त्या इतिहासाविषयीं अज्ञानमूलक तिरस्कारही तितकाच गर्ह्य व हानिकारक नाहीं काय? अशा विचाराचा प्रादुर्भाव मनांत होऊन त्या अज्ञानाच्या उच्छेदार्थ 'मूले कुठारः घालण्याची प्रेरणा होणें व त्या प्रेरणेचें फल प्रस्तुत पुस्तकाच्या रूपानें दृश्य होणें हें आमच्या उदयोन्मुखतेचें लक्षण आहे असे वाटून माझ्या मनाला जो संतोष वाटतो, व त्या संतोषाच्या भरांत मी प्रस्तुत पुस्तकाला सामाजिक सुधारणाविचारांचे अवतारकृत्य असें जें गौरवयुक्त अभिधान वर दिलें, त्यांत मित्रप्रेमामुळें जरी थोडी बहुत अतिशयोक्ति झाली असली, तरी सत्याचा भाग बराच आहे असे विचारी वाचकांस दिसून येईल, अशी मला उमेद आहे.