पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुसरी आवृत्ति. महाराष्ट्रांतील वाचकानें माझें पुस्तक १९१६ सालीं प्रसिद्ध झाल्यापासून अवध्या एका वर्षात ३००० प्रतींस आश्रय दिल्यामुळे गेल्या सहा वर्षात या 'पुस्तकाबद्दल मागणी असतांहि ती पुरवितां आली नाहीं. येथील व्ही. प्रभा कंपनीनें सदरहु पुस्तक व (गुजराथी खेरीज करून) त्याचें इतर भाषेत भाषां- तर प्रसिद्ध करण्याचा हक्क मजकडून घेतला त्यामुळे ही दुसरी आवृत्ति प्रसिद्ध होत आहे. माझ्या धर्मशील देशबांधवांनों आपल्या उदार आश्रयानें प्रकाशकांस अंगीकृत कार्यात मदत करावी अशी विनंति आहे. या पुस्तकावर जे अभिप्राय प्रसिद्ध झाले त्यांत केलेल्या सूचना लक्षांत घेऊन सांप्रतच्या आवृत्तींत बरीच सुधारणा केली आहे. नव्याने उपलब्ध झालेली माहिती ग्रथित केल्यामुळे या पुस्तकाच्या पृष्ठसंख्येंत आणखी ४८ पृष्ठांची भर पडली. ही माहिती वाचकांस मनोरंजक व महत्वाची आहे असे दिसून येईल. या पुस्तकांत निराधार अशी कोणतींही विधानें मीं केलेली नाहींत. ज्या पुस्त- कांच्या आधारानें हीं विधानें केली त्यांचा नामनिर्देश करणे म्हणजे माझें पांडित्य प्रगट करण्यासारखे आहे असे वाटल्यावरून मी त्याचा नामनिर्देश केला नाहीं. माझी कृति माझ्या महाराष्ट्रीय बंधुभगिनींस प्रिय झाली. विद्वज्जनांनीं व वृत्त- पत्रकारांनी तिचा गौरव केला. गुर्जर वर्गांचें लक्ष या विषयाकडे जाऊन अहम- दाबाद येथील गुजरात विद्यापीठाच्या पुरातत्व मंदिरानें या पुस्तकाचें गुजराथी भाषांतर प्रसिद्ध केलें. या गुणग्राहित्वाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. 'ऋग्वेदी.' सरस्वती बाग, आंधेरी, । गुढीपाडवा शके १८४६. J ३